Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: संतापजनक प्रकार! विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बेंद्री गावात विनयभंगाची तक्रार केल्याच्या रागातून सूड उगवत महिलेच्या पतीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. पती 50% भाजले; तिघांना अटक, गावात तणाव.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 31, 2025 | 11:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • विनयभंगाच्या तक्रारीचा आरोपीकडून सूड
  • महिलेच्या पतीवर पेट्रोल ओतून आग
  • पीडित सुमारे 50% भाजले, प्रकृती गंभीर
नांदेड: नांदेडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि याचाच राग मनात धरून आरोपींनी तिच्या पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पती गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना बेंद्री गावात २९ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे.

Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…

काय नेमकं प्रकरण?

संतोष माधवराव बेंद्रीकर हा आपल्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेकडे सातत्याने वाईट नजरेने पाहत होता. वेळोवेळी त्याने महिलेशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. अखेर त्रास सहन न झाल्याने संबंधित महिलेने २२ डिसेंबर रोजी संतोष बेंद्रीकरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्हा दाखल होताच गावात दोन्ही कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी आणि त्याचं कुटुंबीयांनी थरकाप उडवणारा कट रचला. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी महिलेच्या पतीला एकटे गाठण्याची संधी साधली. पहाटेच्या वेळी पीडित आपल्या गोठ्यात असतांना आरोपी व त्याच्या नातेवाईकांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी पतीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले.

उपचार सुरु

जखमी अवस्थेत पतीने आरडाओरडा केला आणि काही ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले, त्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. तातडीने पीडित व्यक्तीला रुगालयात दाखल करण्यात आले. यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. पीडित व्यक्ती सुमारे ५० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर मुख्य आरोपी संतोष बेंद्रीकरसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेनंतर बेंद्री गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात बंदोबस्त वाढवला आहे. नारिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बेंद्री गावात.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: विवाहित महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्याचा राग.

  • Que: जखमीची स्थिती काय आहे?

    Ans: जखमीची स्थिती काय आहे?

Web Title: Nanded crime outrageous incident enraged over a complaint of molestation an attempt was made to burn a womans husband alive by dousing him with petrol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 11:18 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…
1

Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…

Uttarpradesh Crime: बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्या अन् वाद भडकला; दाजीने मेहुण्याचा चाकू भोसकून खून
2

Uttarpradesh Crime: बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्या अन् वाद भडकला; दाजीने मेहुण्याचा चाकू भोसकून खून

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या
3

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

Nagpur Crime: नागपूरमध्ये कौटुंबिक वादातून जावयावर चाकूहल्ला; मामसासरे अटकेत
4

Nagpur Crime: नागपूरमध्ये कौटुंबिक वादातून जावयावर चाकूहल्ला; मामसासरे अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.