नेमकं काय घडलं?
कानपूरच्या महाराजपूर भागातील बाम्बुरिया गावात राहणारा दिपू यादव सैन्य दलात भरती होण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होता. उत्तम तयारी व्हावी या उद्देशाने तो आसाममधील डिब्रूगड येथे गेला होता. दिपूचे त्याच्याच गावातील एका मुलीसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या घरच्यांनी या नात्याला कडाडून विरोध केला होता. हा वाद मिटावा आणि दिपूने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे यासाठी १० महिन्यांपूर्वी पालकांनी त्याला आसामला पाठवले होते. दिपू आसामला गेल्याने मुलगी धास्तावली होती. दिपू आता आपल्याशी लग्न करणार नाही किंवा ब्रेकअप करेल, अशी भीती तिला वाटत होती.
२७ डिसेंबर रोजी या प्रकरणातला हिंसक वळण मिळाले. मुलीने दिपूला व्हिडीओ कॉल केला आणि “जर तू माझ्याशी लग्न केले नाहीस, तर मी जीव देईन,” अशी धमकी देण्यास सुरुवात केली. याच वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे दिपू प्रचंड मानसिक तणावात होता. कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्या मुलीने त्याला इतके प्रवृत्त केले की, त्याने तिच्यासमोरच व्हिडीओ कॉल सुरु असतांना गळफास लावून घेतला आहे.
सोमवारी त्याचा मृतदेह मूळ गावी पोहोचला, तेव्हा संपूर्ण गावावर शोककळा पसरली. लेकाचा मृतदेह पाहून पालकांनी हंबरडा फोडला. दिपूच्या वडिलांनी दिलेल्या तारकारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दिपूच्या मोबाईलमधील शेवटचा कॉल हा त्या मुलीचाच होता. हे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस आता कॉल रेकॉर्डस् आणि मेसेजची कसून चौकशी करत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
Ans: प्रेयसीकडून लग्नासाठी दिल्या जाणाऱ्या सततच्या धमक्या आणि मानसिक तणावामुळे.
Ans: आसाममधील डिब्रूगड येथे, जिथे तो सैन्य भरतीची तयारी करत होता.
Ans: शेवटचा व्हिडिओ कॉल, मेसेजेस आणि कॉल रेकॉर्ड तपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






