Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: नांदेडमध्ये जादूटोणा! चोरीच्या संशयावरून दोघांना खाऊ घातला मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून एक जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेला नागोळीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 13, 2025 | 10:05 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून एक जादूटोण्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेला नागोळीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा विडा खाल्यानंतर शरीराला आणि मनाला वेदना झाल्याचं पीडित व्यक्तीने सांगितले आहे.या अघोरी प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादूटोना प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाप लेकासह जादू टोना करणाऱ्या भोंदूबाबाचा देखील समावेश आहे.

गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…

नेमकं काय घडलं?

रामा आरोटे यांनी ११ ऑगस्ट रोजी भोंदू बाबांनी दिलेले पानाचे विडे गावातील परमेश्वर कंठीराम राठोड यांना व आणखी एका व्यक्तीला दिले. यावेळी विडा खाल्याने परमेश्वर यांच्या शरीराला व मनाला वेदना झाल्या. विडा खाऊ घातल्याचा व्हिडीओ एकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. परमेश्वर कांतिराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायदा प्रमाणे मांत्रीक गंगाराम संका कादरी यांच्यासह रामा नारायण आरोटे (वय 55), गंगाधर रामा आरोटे (वय 30), राजू नारायण आरोटे (वय 40 राहणार केरूर) या चौघा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार काळे हे पुढील तपास करीत आहे. या घटनेने बिलोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Palghar News: स्मशानभूमीत अघोरी पूजा करतांना मांत्रिक पळाला, कारण काय?

मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या सातिवली गावातील पाटील पाड्याच्या स्मशानभूमी परिसरातील ओहोळा लगतच्या खडकावर अघोरी कृत्य आणि पूजा सुरू असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्ती अध्यक्ष, महिला आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पूजास्थळी ग्रामस्थ येत असल्याची कुणकुण लागताच अघोरी पूजा करणाऱ्या आणि पुजाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांनी अघोरी पूजेबाबत जाब विचारला असता पूजेत सहभागी असलेल्याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालत अरेरावीची करत घटनास्थळावर निघून गेला.

घटनास्थळी काय मिळालं?

घटनास्थळी अघोरी पूजे आणि जादू टोण्यासाठी पिठाची बाहुली, लिंबू,चाकू, पांढरी टोपी, बिडी – सिगरेट, कोंबड्याची पिसे, अबीर, गुलाल आणि अगरबत्ती आदी साहित्य आढळून आले आहे.

ग्रामस्थांची मागणी काय?

याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देऊन सुद्धा पोलीस घटनास्थळी फिरकले नाही त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.अघोरी पूजा आणि जादू टोण्याच्या प्रकारामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता असून पूजा घालणाऱ्या विरोधात पोलिसांना कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. त्यामुळे पोलीस आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चोरले आईचे दागिने; ११ तोळे दागिन्यांसह दीड लाख केले लंपास

Web Title: Nanded crime witchcraft in nanded two people were fed a spell made of a leaf of a plant on suspicion of theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
1

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Crime News : ‘एका रात्रीत अभिनेत्री बनवीन…, प्रशिक्षणाच्या बहाण्याने बोलवलं अन्…,’ दीड वर्ष केला बलात्कार
2

Crime News : ‘एका रात्रीत अभिनेत्री बनवीन…, प्रशिक्षणाच्या बहाण्याने बोलवलं अन्…,’ दीड वर्ष केला बलात्कार

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी
3

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड
4

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.