Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: नांदेडमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची अमानुष मारहाण; जागीच मृत्यू

नांदेड येथील 22 वर्षीय तरुणाला विवाहित महिलेशी संबंधांच्या संशयातून घरातून उचलून नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू; सात जण अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 05, 2026 | 12:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • थडीसावळी येथे पहाटे घरातून जबरदस्तीने नेऊन मारहाण
  • केबल वायरने व गुप्तांगावर हल्ला; तरुणाचा मृत्यू
  • रामतीर्थ पोलिसांनी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल
नांदेड: नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातलगातील विवाहित महिलेसोबत संबंध ठेवल्याचा रागातून २२ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ३ मार्च रोजी पहाटे मौजे थडीसावळी येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मृत तरुणाचे नाव दुर्गेश सिंह ठाकूर (रा. मुतण्याळ, ता. बिलोली) असे आहे. तो व्यवसायाने इलेक्ट्रीशियन होता. दुर्गेश याचे थडीसावळी येथील नातलगातील एका विवाहित महिलेसोबत संबंध असल्याचा संशय होता. ही बाब महिलेच्या कुटुंबियांना समजताच संतापलेल्या नातेवाईकांनी ३ मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास दुर्गेशसिंहच्या घरी जाऊन त्याला जबरदस्तीने उचलून थडीसावळी येथे आणले.

Madhyapradesh: मध्यप्रदेश हादरला! अनैतिक संबंधांच्या संशयातून 18 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या; मृतदेह १० दिवस घरातच ठेवला आणि…

त्यांनतर तिथे “आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस?” असा जाब विचारण्यात आला. आरोपींनी दुर्गेशसिंह आणि संबंधित महिलेला केबलच्या वायरने मारहाण केली. दुर्गेशसिंहच्या गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्यांनतर त्याला उलट्या होऊन तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सात जणांना अटक

पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून महिलेचा पती पद्मसिंह गंगासिंह ठाकूर याच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव राजूसिंह गंगासिंह ठाकूर, गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर (रा. थडीसावळी), तसेच दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर (रा. निर्मल, तेलंगणा) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी सर्व आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनतर थडीसावळी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावात.

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: विवाहित महिलेशी संबंध असल्याच्या संशयातून मारहाण.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सात आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Nanded crime youth brutally beaten on suspicion of having an immoral relationship in nanded dies on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.