Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Case : ‘पश्चात्तापाचा लवलेश नाही’, भीमराव कांबळेला मृत्युदंड…! नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Nasrapur Case Verdict News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी अवघ्या दीड महिन्यात न्यायालयाने निकाल दिला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला दोषी ठरवले असून शिक्षेबाबत युक्तिवाद सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2026 | 12:12 PM
नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी! नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी! नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी!
  • नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
  • आज न्यायालयात काय घडले?
Nasrapur Case Verdict News in Marathi : १ मे 2026 रोजी म्हणजेच महाराष्ट्रदिनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापजनक पडसाद उमटले आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्याचा निकाल आज (गुरुवारी, २५ जून 2026) लागत आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात इतक्या जलद गतीने निकाल देणारे हे पहिलेच प्रकरण असल्याचे मानले जात आहे. तसेच ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 29 जून शिक्षा सुनावणार असून कोर्टाने कांबळेचा निकाल राखून ठेवला आहे.

नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, अंतिम युक्तिवाद पुर्ण; पुढील आठवड्यात…

या प्रकरणात पोलिसांनी भीमराव प्रभाकर कांबळेला अटक केली असून पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयात सध्या शिक्षेवर सुनावणी सुरु आहे. आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आले. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल जाहीर केला असून शिक्षेबाबतचा युक्तीवाद सध्या सुरू आहे.

आज न्यायालयात काय घडले?

नसरापूर हत्याकांडातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवले असून सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आणि घटनेची आठवण करून आपली शिक्षा सांगण्यास सांगितले. आरोपी भीमराव कांबळेने न्यायालयात वेगळीच कहाणी सांगितली, “त्या दिवशी मी मुलीला ‘गाठी-सेव’ खाऊ घालण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी माझा पाय घसरला आणि मी पडलो. त्याचवेळी मुलीच्या डोक्यालाही दुखापत झाली. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती रडतच राहिली.”

त्यानंतर न्यायाधीशांनी दोषी भीमराव कांबळेने सांगितले, “तुम्ही आता जे काही सांगत आहात ते आता इतिहासजमा झाले आहे, कारण तुमच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला आहे. तुम्हाला काय शिक्षा द्यावी?” भीमराव कांबळेने या प्रश्नावर काहीही उत्तर दिले नाही. दोषी भीमराव कांबळेला कोणती शिक्षा द्यावी यावर दोन्ही पक्षांमध्ये न्यायाधीशांसमोर चर्चा सुरू आहे.

आज सकाळी साधारण १० वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक आरोपी भीमराव कांबळे याला घेऊन पुणे न्यायालय आवारात पोहोचले. सुरक्षेची काळजी घेत आरोपीला न्यायालयाच्या एका विशेष खोलीमध्ये ठेवण्यात आले. ज्या खोलीत आरोपीला ठेवण्यात आले आहे, त्या खोलीच्या बाहेर आणि आजूबाजूच्या परिसरातही पोलिसांचा कडक पहारा लावण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदेशीर प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

“65 वर्षांचा आहे म्हणून काय…” मराठी सिनेविश्वातून पुणे प्रकरणावर हल्लाबोल!

Web Title: Nasarapur minor girl rape murder case verdict accused convicted in record time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
2

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.