ऐन निवडणुकीत बेरोजगार तरुणांच्या नावावर 10 ते 15 कोटींची रक्कम जमा
Maharashtra Assembly election 2024: ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आला. नाशिक येथील मालेगावमध्ये मर्चंट बँकेच्या शाखेत गेल्या १५ ते २० दिवसांत सुमारे १२ खात्यांमध्ये १,००,००,००० रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आलं आहे. शहरातील बेरोजगार तरुणांच्या खात्यात उलाढाल झाली असून ज्यांच्या नावे हे व्यवहार झाले त्यांना मात्र याबाबत काहीच कल्पना नव्हती. शिवसेनेचे पदाधिकारी आणि बेरोजगार तरुणांनी मालेगावात पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत. बँक खात्यात अचानक इतके पैसे आले कुठून आणि ते कशासाठी वापरले जात आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मालेगावातील 12 बेरोजगार तरुणांच्या नावावर बनावट कंपन्या तयार करुन कुणाच्या नावावर 10 तर कुणाच्या नावावर 15 कोटी अशा रकमेपर्यंत व्यवहार नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव येथील शाखेत करण्यात आले. या तरुणांना मालेगाव बाजार समितीने नोकरीचे आमिष दाखवून सिराज अहमद या इसमाने तरुणांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सह्या घेत नाशिक मर्चेंट बँकेच बनावट खाती उघडली आहे. त्या खात्यावरुन 10 ते 15 दिवसांमध्ये शेकडो कोटींचे आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आलं आहे.
हे सुद्धा वाचा: मतदानाच्या दिवशी मुंबईत कामगारांना पगारी सुट्टी द्या, अन्यथा…, आयुक्तांचे निर्देश पत्रक जारी
हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर 12 तरुणींनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी व बेरोजगार तरुणाने पत्रकार परिषद घेण्याची मागणी केली. दरम्यान, यामागे कोणाचा हात आहे? याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 15 दिवसांत 100 कोटी रकमेची खात्यातून उलाढाल होणे, आणि ज्यांच्य खाच्यातून झाली त्यांना माहीतच नसणे म्हणजे यामध्ये काहीतरू गोडबंगाल असल्याचं म्हटलं जात आहे.
तर दुसरीकडे निवडणुकांच्या काळात मुंबईत घातपात घडविण्यासाठी रचण्यात आलेला कट मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा २ च्या पथकाने उधळून लावला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ९ देसी पिस्तुल, २१ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला असून ८ जणांना अटक केली आहे. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच संभाव्य घातपाताच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधिक दक्ष असतात. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा क्रमांक २ च्या पथकाला वसईच्या सुरूची बाग परिसकरात असलेल्या दोन तरूणांकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे सापडली. यानंतर पुढील तपासात घातपात घडविण्याचा षडयंत्राचा पर्दाफाश झाला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे आणि त्यांच्या पथकाने गुजराथ आणि उत्तरप्रदेश येथे सापळा लावून तब्बल ८ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ९ देशी पिस्टल आणि २१ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा: “गेल्या १५ वर्षात कसलाच विकास न केल्यामुळे…”; गावभेटीदरम्यान समाधान आवताडेंची भालकेंवर टीका