महायुतीचे पंढरपूरचे उमेदवार (फोटो- समाधान आवताडे )
सध्या संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच अनेक मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती पाहायला मिळत आहेत. यातील सर्वात रंगतदार लढत म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहिले जात आहे. या मतदारसंघात सलग-तीन टर्म आमदार असणारे स्वर्गीय भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना मंगळवेढा येथील विद्यमान आमदार समाधान आवताडे या एका शेतकरी पुत्राने थेट आव्हान देत जेरीस आणून सोडले आहे. महायुती कमळ या चिन्हावर लढणाऱ्या समाधान आवताडे यांचा सामना स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्यासोबत होणार आहे. काल समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील या गावामध्ये गावभेट दौरे आयोजित करण्यात आले होते.
समाधान आवताडे यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे तसेच कमळ चिन्हाबद्दल लोकांमध्ये असलेल्या प्रसिद्धीमुळे समाधान आवताडे यांच्या गाव भेट दौऱ्यांना मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी बोलताना समाधान आवताडे यांनी विरोधी गटाचा खरपूस समाचार घेतला, यावेळी बोलताना ते म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अनेक विषय जाणिवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत.गेल्या १५ वर्षात सत्ता असूनही यांना पाणी तसेच रस्ते , शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. सोबतच यांनी १५ वर्षात जेवढा विकास केला नाही तेवढा विकास मी तीन वर्षात करून दाखविला आणि इथून पुढेही याच्या पेक्षाही जास्त विकास करून दाखवीन असे आवाहनही लोकांना केले.
ज्यांना गेले तीन वर्षात सत्तेत भागीदारी दिली, त्याच लोकांनी जनतेची ऐनवेळी साथ सोडली मात्र आता निवडून येणे शक्य नसल्याचे त्यांना दिसू लागल्यानेच त्यांनी जनतेचे उंबरे झिजवले. मात्र गेल्या १५ वर्षात कसलाच विकास न केल्यामुळे त्यांना मागच्या पोटनिवडणुकीत तिथूनही रिकाम्या हाताने परत यावे लागले. इथेच त्यांचा पराभव झाला असा घणाघात त्यांनी भगीरथ भालके यांच्यावर केला. अनेक लोकांनी बोलतांना सांगितले की दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून समाधान आवताडे यांची ओळख निर्माण झाली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता समाधान आवताडे म्हणजे आशेचा किरण म्हणून पाहत आहेत.यावेळी अनेक प्रमुख मान्यवर तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. अशा मध्येच २२ गावांमध्ये समाधान आवताडे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून आले.