काय नेमकं घडलं?
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सखाराम पंडित भावसार (वय ६५) असे आहे. ते पेठ रोडवरील नवनाथ नगर रोकडे चाळ परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. तर आरोपीचे नाव अश्विन भावसार (वय ३५) असे आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अश्विन आणि त्याच्या वडिलांमध्ये कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद झाला. सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता मात्र काही काळानंतर या वादाची रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत अश्विन ने संतापून जवळ असलेला चाकू उचलून वडील सखाराम यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. हा हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता.
Pune Crime: शिरूरमध्ये थरारक उलगडा! 12 वर्षीय साईराजची हत्या; वर्षभरापूर्वीच्या घटनेशी साम्याने खळबळ
दीड महिन्याच्या उपचारानंतर मृत्यू
या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेला सखाराम भावसार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दीड महिन्यांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र अखेर उपचारादरम्यान त्यांची मृत्यू झाली.
आरोपी अटकेत
या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस हे तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी अश्विन भावसार याला अटक करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
भोंदू ‘कॅप्टन’चा काळा चेहरा उघड; बलात्कार प्रकरणात अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; काय नेमकं प्रकरण?
नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदूगिरीच्या आड गंभीर गुन्हे केल्याचा आरोप असलेल्या ‘स्वघोषित कॅप्टन’ अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट-1 ने अटक केली असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी तसेच प्रभावशाली व्यक्तींचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धक्कादायक उघडकीमुळे प्रकरण आणखी गंभीर बनले असून, या संपूर्ण रॅकेटचा तपास आता अधिक सखोलपणे केला जात आहे.
Gondia Crime: संतापजनक! आधी अपहरण, नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम अटकेत
Ans: नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडली.
Ans: कौटुंबिक कारणावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला होता.
Ans: आरोपी मुलाला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.






