गोंदिया: गोंदिया मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मुस्लिम तरुणाला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून सकल हिंदू समाजाने कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
काय घडलं नेमक?
आरोपीने पीडित मुलीला मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट येथे अपहरण करून नेलं त्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या अत्याचाराची माहिती तिने आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हेचा गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका मुस्लिम तरुणाला याप्रकरणी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
Crime News: युवकाकडून अल्पवयीन मुलाचा खून; एकवीस महिन्यात हुबेहूब घटना, विषय काय?
सकल हिंदू समाज आक्रमक
या प्रकरणानंतर सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून शाईकडून हिंदू समाज बांधवांनी पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांची भेट घेतली. या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. आता पोलीस पुढील कारवाई काय करणार याकडे लक्ष लागलेले आहे. या घटनेने खळबळ मिळाली आहे.
गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक टँकमध्ये, नेमकं काय घडलं?
गोंदिया येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशच्या भोपाळला गेली. मात्र ती घरी परतलीच नाही. एका सेप्टिक टँकमध्ये थेट तिचा मृतदेह सापडला. अशरफी उर्फ सिया (३३ वर्षीय) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा २४ तासात उलगडा केला आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळच्या निशातपुरा परिसरातील एका रिकाम्या प्लॉटमध्ये बांधलेल्या सेप्टिक टँकमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला. गुरुवारी संध्याकाळी मुलं खेळात असताना त्यांना टँकमधून दुर्गंध येऊ लागला. त्यांनी ही बाब घरच्यांनी सांगितली. पाहणी करताना टँकमध्ये लोखंडी पेटी तरंगताना दिसली. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता पेटीत मृतदेह सापडून आला. मृतदेह इतका कुजलेला होता की शरीरावरील जखमा स्पष्ट दिसत नव्हत्या. पण तिच्या हातावरील ‘दीपक’ नावाचा टॅटू आणि जन्मतारखेच्या आधारे तिची ओळख पटली. ही घटना 12 फेब्रुवारीला संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली. सिया ही मूळची महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली. तेव्हा भयंकर समोर आलं.
Badlapur Crime: मुलीच्या वागण्यावरून वाद; नवऱ्याने पट्ट्याने गळा आवळून पत्नीची हत्या






