crime (फोटो सौजन्य: social media )
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाद होतांना पाहायला मिळत. हत्या, हाणामारी, दरोडा, चोरी अश्या अनेक घटना समोर येत आहे. आता नाशिक मधून एक चोरीची घटना समोर आली आहे. चक्क आमदाराच्य घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरी दुसरं तिसरं कोणी नाही तर आमदाराच्या मोलकरीणबाई ने केली आहे. ही चोरी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांच्या जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झाली. या प्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या मोलकरीणचं नाव संगीता श्याम केदारे (रा. जेल रोड) असे आहे. हिने कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
याबाबती अधिकची माहिती अशी, या प्रकरणी डॉ. प्रवीण रामदास वाघ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की , रविवारी (दि. 6 जुलै) दुपारी संगीता केदारे हिने कपाटातून एक लाख रुपये चोरून नेले. या काळात आमदार सरोज अहिरे या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत होत्या. या काळातच मोलकरणीने पैशांवर डल्ला मारलाय. यासोबतच ऑक्टोबर 2024 ते 15 जुलै 2025 या कालावधीत घरातून वेळोवेळी रोख रक्कम चोरून नेल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी मोलकरीण संगीता केदारे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान वाईतून एक चोरीची घटना समोर आली आहे. वाईच्या गंगापुरीतील सृष्टी अपार्टमेंटमधील बंद सदनिका हेरून सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी कुलुप तोडले, आत प्रवेश करुन कपाटातील सोने आणखी दिड लाख रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथीलच आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून तेथील कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या वाई शहरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वाईच्या गंगापुरीत सृष्टी अपार्टमेंटमध्ये सदनिका क्र. ७ मध्ये विशाल धनाजी जरंडे पत्नी विनीता यांच्यासह राहतात. दोघेही शिक्षक आहेत. गुरुवारी (दि. १७) सकाळी नऊ वाजता सुमारास ते शाळेसाठी दरवाजाला कुलूप लावून निघून गेले. याचाच फायदा चोरट्यांनी घेऊन त्यांच्या घराच्या दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे कुलुप तोडून त्यात ठेवलेले १३ लाख रुपये किंमतीचे १९ तोळे सोन्याचे दागिने व दिड लाख रुपये रोख रक्कम असा एकूण साडेचौदा लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.
दरम्यान त्यानंतर समोरच्या एका सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून तेथेही चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाले. याबाबत विशाल धनाजी जरंडे (रा. आसरे, ता. वाई, सध्या रा. सृष्टी अपार्टमेंट गंगापुरी, वाई) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पुढील तपास करीत आहेत.
मोठा निर्णय; आत्मदहनाचा प्रयत्न केल्यास वसूल करणार बंदोबस्ताचा खर्च