अकोला शहरात शुक्रवारी (१८ जुलै) ला दोन गटात वाद होत गॅंगवॉर झाला होता. हा गॅंगवॉर वर्चस्वाच्या लढाईतून झाला होता. यात ताल्वारीसह बंदुकीचा वापर झाला होता. या वादादरम्यान दोन गट आमने -सामने भिडले. गोळीबार करण्यात आला. एक हवेत गोळी फायर करण्यात आली होती. या संपूर्ण गॅंगवॉरमध्ये जवळपास ८ जण जखमी झाले होते. घटनस्थळावरून २ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. काही जखमी आरोपींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले आहे. ही घटना कृषी नगर परिसरात घडली आहे. दरम्यान आरोपींची घटनास्थळी पोलिसांनी धिंड काढली.
नवजात अर्भकाची ७० हजार रुपयात विक्री; भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
पुढे आलेल्या माहितीनुसार, अकोल्यात कृषी नगर परिसरात दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून वाद झाला. आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वाद झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींसह देशी बनावट पिस्तूल आणि तलवारी जप्त केले. पोलिसांनी दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांची आता कृषी नगर परिसरात धिंड काढली. दरम्यान यावेळी आरोपींनी कान पकडून माफी मागितली. तसेच यापुढे आपण गुन्हेगारी मार्गावर जाणार नाही असे आरोपींची कान पकडून पोलिसांना सांगितले. या वादामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
पर्वती दर्शन भागात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
दरम्यान, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पर्वती दर्शन भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आदेश संजय काळे (वय ४१, रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमित काळे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची मुलगी घरातून निघून गेली होती. मुलीला पळून जाण्यास आरोपी आदेश काळेने मदत केल्याचा संशय महिलेला होता. याबाबत महिलेचा पुतण्या अमितने आरोपी आदेशला जाब विचारला होता. १६ जुलै रोजी त्यांच्यात वाद झाला. वादातून आदेशने अमितच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. मारहाणीत अमित गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आदेशला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक नामदे तपास करत आहेत.
सुरक्षारक्षकाचीच सुरक्षा धोक्यात; चाकूने भोसकून केली हत्या, मध्यरात्री घडला थरार