Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; अन् पुन्हा कधीच परतले नाही!, ३३ वर्षीय इंजिनिअर…

गणेशोत्सवाच्या आनंदात कंपनीत गणरायाच्या स्थापनेसाठी गेलेला तरुण घरी परतलाच नाही. अंबडहून मुंबई नाक्याकडे येताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 15, 2026 | 12:29 PM
Nashik Crime: गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; अन् पुन्हा कधीच परतले नाही!, ३३ वर्षीय इंजिनिअर...

Nashik Crime: गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; अन् पुन्हा कधीच परतले नाही!, ३३ वर्षीय इंजिनिअर...

Follow Us
Follow Us:
  • मुंबई नाका परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला दिली पाठीमागून धडक
  • गणरायाच्या स्थापनेच्या कार्यक्रमासाठी कंपनीत गेले असल्याची माहीती
  • अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाल्याची माहीती
नाशिक: शहरातील मुंबई नाका परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ३३ वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअरचा मृत्यू झाला. किरण चांगदेव नरोडे असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. मुंबई नाका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा:Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक खोलीत गेले अन्…

गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; परतलेच नाहीत

किरण नरोडे एका कंपनीत मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. गणेशोत्सवानिमित्त कंपनीत गणरायाची स्थापना करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी ते कंपनीत गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते अंबडहून दुचाकीवरून मुंबई नाक्याच्या दिशेने येत होते. याचदरम्यान भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर किरण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात

पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. ट्रक कोणत्या दिशेने गेला, तसेच त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विविध मार्गांवरील फुटेजची पाहणी केली जात आहे.

हेही वाचा:Nashik Cyber Crime: थायलंडच्या नंबरवरून जिल्हाधिकाऱ्यांचा ‘फेक’ अकाउंट; ‘Hello… How are you?’ मेसेज अन्… 

नरोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कंपनीतील गणरायाच्या स्थापनेच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या किरण यांचा परतीच्या प्रवासात अपघाती मृत्यू झाल्याने नरोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Nashik mumbai naka hit and run mechanical engineer death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Accident in Nashik
  • Hit and Run

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.