सौजन्य फोटो - AI Gemini
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी घरात तसेच गल्लीतील गणेश मंडळाच्या बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरू होती. कुटुंबीय पूजेच्या तयारीत व्यस्त असतानाच हेमांगी या मुलाला घेऊन एका खोलीत गेल्या. काही वेळाने पूजा सुरू होण्याची वेळ झाली, तरी त्या बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा ठोठावून त्यांना आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शनिपेठ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खोलीत माय-लेक गंभीर अवस्थेत आढळले.
पोलिसांनी दोघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माय-लेकाने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






