फोटो सौजन्य - AI Gemini
मिळालेल्या माहितीनुसार, +६६ ९२ ४५५ ६०७४ या थायलंडमधील क्रमांकाचा वापर करून हे बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यात आले आहे. संबंधित अकाउंटवर ‘बिझनेस अकाउंट’ असे दर्शविण्यात येत आहे. या अकाउंटवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यात आले असून, त्यांच्या पदाचा गैरवापर करून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा:Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक खोलीत गेले अन्…
या बनावट अकाउंटवरून “Hello… How are you doing… Where are you at the moment?” अशा स्वरूपाचे संदेश पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या संदेशांच्या माध्यमातून संबंधित व्यक्तींशी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार सायबर फसवणुकीच्या उद्देशाने केला जात आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, या बनावट अकाउंटमागे नेमका कोणाचा हात आहे आणि नागरिकांशी संपर्क साधण्यामागील उद्देश काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या बनावट अकाउंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित परदेशी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला, फोनला अथवा अन्य स्वरूपातील संपर्काला प्रतिसाद देऊ नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या क्रमांकावर वैयक्तिक माहिती, महत्त्वाची कागदपत्रे, ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित तपशील देऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.
नागरिकांना एखाद्या संशयास्पद क्रमांकावरून संदेश किंवा फोन आल्यास त्याकडे दुर्लक्ष करून संबंधित यंत्रणेला त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा किंवा पदाचा गैरवापर करून तयार करण्यात आलेल्या अशा बनावट अकाउंटपासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या बनावट व्हॉट्सॲप अकाउंटबाबत पुढील तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






