Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Crime latest Update: आरोपी   भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत १२ मे पर्यंत वाढ

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याचे आश्वासन दिले आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याबाबतही सरकार स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहि

  • By anuradha sagar
Updated On: May 07, 2026 | 06:53 PM
नसरापूर प्रकरणाची पोलिसांनी दिली 'अप-टू-डेट' माहिती; तपासाचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' त्याचदिवशी तयार

नसरापूर प्रकरणाची पोलिसांनी दिली 'अप-टू-डेट' माहिती; तपासाचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' त्याचदिवशी तयार

Follow Us
Follow Us:
  • आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलीस कोठडीत वाढ
  • चार वर्षांच्या मुलीला वासरू दाखवण्याच्या बहाण्याने गोठ्यात नेऊन तित्यावर अत्याचार करून तिची हत्या
  • २०१५ मध्ये त्याच्यावर पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
Nasrapur Crime latest Update:     नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने आरोपीला १२ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीची हजेरी

आरोपीची पूर्वीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात आणण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तपासातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन न्यायालयाने ही मागणी मान्य केली.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होता होता राहिला! पायलटच्या धाडसामुळे

नेमकी घटना काय?

ही धक्कादायक घटना १ मे २०२६ रोजी घडली होती. आरोपी भीमराव कांबळे याने चार वर्षांच्या मुलीला वासरू दाखवण्याच्या बहाण्याने गोठ्यात नेऊन तित्यावर अत्याचार करून तिची हत्या केली.  इतकेच नव्हे तर गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

विशेष तपास पथकाकडून तपास

या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. संदीप सिंग गिल यांच्या नेतृत्वाखाली सहा अधिकाऱ्यांचे पथक तपास करत आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तसेच इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपीविरुद्ध भक्कम आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.

तपासादरम्यान आरोपीचा पूर्वीचाही गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. २०१५ मध्ये त्याच्यावर पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तसेच १९९८ मध्ये विनयभंगाच्या प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते. या सर्व जुन्या प्रकरणांची माहिती पुन्हा तपासली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘देवेंद्र फडणवीस नवं पुण्याचे शिल्पकार’ झाल्यापासून पुण्यात दररोज एक बलात्कार;

या घटनेनंतर नसरापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश उसळला. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी पुणे-बंगळूरू महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याचे आश्वासन दिले आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याबाबतही सरकार स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून पीडित कुटुंबाला कायदेशीर आणि आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

 

Web Title: Nasrapur case court extends bhimrao kambles police custody till may 12

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • Bhor Crime
  • pune crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pune District Court: न्यायालय हजेरी की पर्यटनस्थळ? पुणे न्यायालयाचे मायक्रो सुरक्षा ऑडिट
1

Pune District Court: न्यायालय हजेरी की पर्यटनस्थळ? पुणे न्यायालयाचे मायक्रो सुरक्षा ऑडिट

पुणे जिल्ह्यात चोट्यांचा उच्छाद, भोरमधील ‘स्वप्नलोक सोसायटी’तील 5 बंद घरे फोडली; तब्बल…
2

पुणे जिल्ह्यात चोट्यांचा उच्छाद, भोरमधील ‘स्वप्नलोक सोसायटी’तील 5 बंद घरे फोडली; तब्बल…

पुण्यातील सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! तब्बल 7 वाहनांना उडवले; घटना CCTV मध्ये कैद 
3

पुण्यातील सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! तब्बल 7 वाहनांना उडवले; घटना CCTV मध्ये कैद 

महाळुंगेतील भूखंड वाद तापला, दोन्ही बिल्डरांकडून परस्परांवर आरोप; नेमकं काय घडलं?
4

महाळुंगेतील भूखंड वाद तापला, दोन्ही बिल्डरांकडून परस्परांवर आरोप; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.