Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…

एमएनजीएल गॅस कनेक्शन बंद करण्याची धमकी देत सायबर चोरट्यांनी एपीके फाईल पाठवून आंबेगाव बुद्रूक येथील ४५ वर्षीय व्यक्तीची ६ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2026 | 12:30 AM
गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्...

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्...

Follow Us
Follow Us:
  • एमएनजीएलच्या नावाखाली ६.२२ लाखांची फसवणूक
  • एपीके फाईल पाठवून मोबाईल हॅक केला
  • आंबेगाव बुद्रूक येथे सायबर फसवणुकीची घटना
पुणे : एमएनजीएल गॅस कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीला तब्बल ६ लाख २२ हजार रुपयांचा गंडा घातला. गॅस कनेक्शन अपडेट न केल्यास गॅस पुरवठा बंद करण्यात येईल, अशी धमकी देत आरोपींनी संबंधित व्यक्तीला मोबाईलवर एपीके फाईल पाठवली. या फाईलद्वारे मोबाईलमधील माहिती मिळवून बँक खात्यातून पैसे काढण्यात आले. ही घटना १८ ऑगस्ट रोजी आंबेगाव बुद्रूक परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आंबेगाव परिसरात राहण्यास आहेत. १८ ऑगस्ट रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण एमएनजीएल गॅस कंपनीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. गॅस कनेक्शन अपडेट करून घेणे आवश्यक असल्याचे सांगत, प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस पुरवठा बंद केला जाईल, अशी भीती दाखवली.

त्यानंतर आरोपीने तक्रारदाराच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवली. त्यामध्ये माहिती भरण्यास सांगून तक्रारदाराला ती फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी मोबाईलचा ताबा मिळवत बँक खात्यातील व्यवहारांवर नियंत्रण मिळवले. काही वेळातच तक्रारदाराच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ६ लाख २२ हजार रुपये दुसऱ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पोटच्या लेकरांना जंगलात नेऊन संपवले; आईला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

बँक खात्यातून साडेतीन लाखांची ऑनलाईन फसवणूक

तरुणाच्या बँकखात्यातून तब्बल ३ लाख ६५ हजार रुपये ऑनलाईनरित्या दुसर्‍या खात्यात वर्ग करुन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २५ ऑक्टोबरला विश्रांतवाडीत घडली असून, याप्रकरणी तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या बँक खात्यातून ऑनलाईनरित्या पैसे कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संपतराव राउत तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : चारित्र्याच्या संशयातून झोपेतच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; वाशिममधील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: सायबर चोरट्यांनी किती रुपयांची फसवणूक केली?

    Ans: तब्बल ६ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

  • Que: फसवणूक करण्यासाठी आरोपींनी कोणती युक्ती वापरली?

    Ans: एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून गॅस कनेक्शन बंद करण्याची धमकी दिली आणि एपीके फाईल पाठवली.

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: १८ ऑगस्ट रोजी पुण्यातील आंबेगाव बुद्रूक परिसरात ही घटना घडली.

Web Title: A resident of the ambegaon budruk area has been defrauded by cybercriminals nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Pune Police

संबंधित बातम्या

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…
1

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…

दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई
2

दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात
3

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात

Minor Girl Suicide Case: पहाटे १:५३ वाजता उघडकीस आला थरार; कांदिवलीत उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या!
4

Minor Girl Suicide Case: पहाटे १:५३ वाजता उघडकीस आला थरार; कांदिवलीत उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.