Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: अनोळखी मृतदेहापासून खुनाचा उलगडा; नवघर पोलिसांनी २ तासांत आरोपींना जेरबंद केले

अनोळखी मृतदेह सापडल्याच्या घटनेचा नवघर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडा करत खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जलद तपास आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत गुन्ह्याचा छडा लावला. या कारवाईमुळे नवघर पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 08, 2026 | 06:48 PM
अनोळखी मृतदेहापासून खुनाचा उलगडा; नवघर पोलिसांनी २ तासांत आरोपींना जेरबंद केले

अनोळखी मृतदेहापासून खुनाचा उलगडा; नवघर पोलिसांनी २ तासांत आरोपींना जेरबंद केले

Follow Us
Follow Us:
  • नवघर पोलिसांची खुनाच्या गंभीर गुन्ह्याची उकल
  • २ तासांत दोन आरोपी अटकेत
  • एक अल्पवयीन ताब्यात
विजय काते, भाईंदर : नवघर पोलिसांनी एका अनोळखी मृतदेहाच्या तपासातून खुनाच्या गंभीर गुन्ह्याची अवघ्या दोन तासांत उकल करत दोन आरोपींना अटक करण्यात आली. एका विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे नवघर पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मीरा-भाईंदर पूर्व येथील सचिन तेंडुलकर मैदानासमोरील कांदळवनातील झाडाझुडपांमध्ये एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेह काही प्रमाणात जळालेल्या अवस्थेत असल्याने मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

कोरेगाव खुर्दमध्ये दोन गटांत मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळी मिळालेल्या वस्तू आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती पडताळताना गौरव विजयप्रकाश बडसर (वय २५, रा. पूजा नगर, केबिन क्रॉस रोड, भाईंदर पूर्व) हा युवक बेपत्ता असल्याची नोंद पोलिसांना मिळाली. घटनास्थळी सापडलेल्या वस्तू आणि गौरवच्या वस्तूंमध्ये साम्य आढळून आल्याने तपासाची दिशा स्पष्ट झाली.

तपासादरम्यान गौरव बडसर याचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यातून विमल प्रेमकुमार राजभर (वय १९) आणि विशाल प्रेमकुमार राजभर (वय २५), दोघेही राहणार गणेश गल्ली, नवघर रोड, भाईंदर पूर्व, तसेच १६ वर्षीय एका विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाचा सहभाग समोर आला.

पोलिस तपासात आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून गौरव बडसर याला दारू पाजून सचिन तेंडुलकर मैदानासमोरील निर्जन कांदळवन परिसरात नेल्याची कबुली दिली. तेथे त्याच्यावर चाकूने वार करून आणि दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

Wardha Crime: क्रूरतेची परिसीमा! हुंड्यासाठी छळ, मारहाण अन् पत्नीला माहेरी सोडून खाजगी व्हिडिओ केले व्हायरल

Web Title: Navghar police solve murder case two accused arrested minor detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.