यवतमाळच्या पुसदमध्ये उधारीचे पैसे मागणाऱ्याला जबर मारहाण; चुलत्यालाही सोडलं नाही
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानंतर आता बीडच्याच आंबेजोगाई तालुक्यामध्ये ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावच्या माजी सरपंचाने एक लाखाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : लग्नाच्या आमिषाने अनेक महिलांची फसवणूक; पुण्यातून आरोपीला घेतले ताब्यात
जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीला विरोध केल्याने निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. अवघ्या महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या न्यायाची मागणी होत असतानाच आणखी एक खंडणीचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये समोर आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये खंडणी हा आता गोरखधंदा झाला आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सरपंच मंगल राम मामडगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनंतर माजी सरपंच, एक सदस्य तसेच उपसरपंचाचा पती या तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर आणि उपसरपंच पदावर सुद्धा महिला आहेत.
विकासकामांमध्ये सातत्याने आणत होते अडथळे
आरोपी विविध कारणे सांगून विकासकामांमध्ये अडथळे सातत्याने आणत होते. खोट्या तक्रारी सुद्धा दाखल करत होते. दुरुस्तीसाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली होती, अशी तक्रार सरपंच मामडगे यांनी केली आहे.
वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी
गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेलं आहे, तर या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. वाल्मिक कराडवरही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) कारवाई करण्यात आलेली आहे. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेतलं.
हेदेखील वाचा : आता ‘या’ नेतेमंडळींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बळ वाढणार; पक्षाला मिळाली नवसंजीवनी