गर्भवतीची चिमुकलीसह विहिरीत उडी
अमरावती : अमरावतीच्या सुफियाननगर परिसरात एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सनोबार सबा अनिस खान (वय 25) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार, पोलिसांकडून आता तपास केला जात आहे.
सनोबार सबा आणि तिचा पती अनिस खान यांचा विवाह 22 जुलै 2023 रोजी झाला होता. दोघे आपल्या लहान मुलीसह सुफियान नगरात भाड्याच्या घरात राहत होते. अनिस खान हा मूळचा चांदूरबाजार तालुक्यातील थुगाव पिपरी येथील असून, तो एसी आणि फ्रीज दुरुस्तीचे काम करतो. सनोबारला मायग्रेन तीव्र त्रास असून, तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, तिने टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप अस्पष्ट आहे.
मंगळवारी (दि. 17) दुपारी अनिस खान घरी परतला असता, घराचे दार आतून बंद होते. त्यांनी आवाज देऊनही पत्नीकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने दार तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी पत्नीचा मृतदेह पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी पत्नीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी पत्नी सनोबार यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सनोबारच्या पालकांनी पतीविरोधात काही महत्त्वाची माहिती दिल्याचे समजते. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली आहे. आत्महत्येमागील कारण मानसिक ताण आहे की कौटुंबिक वाद? हे तपासाअंती स्पष्ट होईल.
महिलेची मुलासह आत्महत्या
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका विवाहितेने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासोबत इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) तसेच विष्णु देशमुख (वय ६) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.