ऐकावं ते नवलचं! मुलाने सावत्र आईसोबत पळून जाऊन केलं लग्न, वडील म्हणाले "माझ्या सर्व इच्छा अपूर्ण..." (फोटो सौजन्य-X)
आई आणि मुलाचे नाते खूप पवित्र असतं. परंतु काही लोक या नात्यालाही कळिमा फासण्यास पुढेमागे पहात नाहीत. हरियाणातील नुह येथूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. या परिसरात एका माणसाच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला म्हणून त्याने दुसरे लग्न केलं. पण त्याचा मुलगा त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत पळून गेल्याचे समजताच डोक्याला हात लावतो. या घटनेनंतर पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, संपूर्ण गावात या प्रेमकथेची चर्चा सुरू आहे.
माहितीनुसार, मोठा मुलगा त्याच्या सावत्र आईला कोर्टात घेऊन गेला. तिथे दोघांनीही कोर्टात लग्न केले. त्यानंतर दोघेही फरार झाले. वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की दोघेही प्रौढ आहेत. याप्रकरणी पीडितेने सांगितले, माझ्या पत्नीचे निधन झाले होते. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी पुन्हा लग्न केले. त्यानंतर मी माझ्या अल्पवयीन मुलासह घरात राहू लागलो. या काळात अल्पवयीन मुलगा आणि सावत्र आईचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांनीही घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि आम्हाला याची काहीच कल्पना आली नाही. दोघेही दागिने आणि अनेक मौल्यवान वस्तू घेऊन घरातून पळून गेले आणि कोर्टात लग्न केले,अशी माहिती मुलाच्या वडिलांनी पोलिसांनी दिली.
पीडित इसम हरियाणाच्या नूंहमध्ये राहतो. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने दुसरं लग्न केलं. लग्नानंतर मी , माझी बायको आणि अल्पवयीन मुलगा असे तिघे राहू लागलो. तो तिला आई म्हणायचा पण त्याच काळात माझा मुलगा आणि माझीच पत्नी, त्याची सावत्र आई, यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला याची काहीच कल्पना आली नाही, असं त्याने पोलिसांना सांगितलं. दोघेही घरातून दागिने आणि अनेक मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले आणि कोर्टात लग्न केले.
यावेळी पीडितेने सांगितले की त्यांचा मुलगा त्याच्या सावत्र आईच्या पायांना स्पर्श करायचा, परंतु दोघांमध्ये प्रेमसंबंध कधी निर्माण झाले आणि दोघेही घरातून फरार झाले हे मला माहित नाही. वडिलांनी पोलिसांना सांगितले की दोघेही घरातून ३० हजार रुपये, दागिने आणि अनेक मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले.
जेव्हा तो व्यक्ती त्याच्या पत्नी आणि मुलाबद्दल तक्रार घेऊन पोहोचला तेव्हा त्याने पोलिसांना सांगितले की मुलगा अल्पवयीन आहे. अशा परिस्थितीत, दोघांचेही न्यायालयात लग्न बेकायदेशीर आहे. तथापि, पोलिसांनी त्या पुरूषाचा दावा फेटाळून लावला आणि म्हटले की दोघांनीही न्यायालयात त्यांच्या प्रौढत्वाचा पुरावा दिला आहे आणि आता दोघेही विवाहित आहेत. पोलिसांनी सांगितले आहे की या प्रकरणाची चौकशी केली जाईल.