पुण्याच्या औंध भागात कोयत्याचा धाक दाखवत दहशहत माजविणाऱ्या सात जणांच्या टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. केवळ इतकाच नाही केली तर ज्या ठिकाणाहून कोयत्याने हल्ला केला त्याच भागातून पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली.
Sangli Crime: मिरजेत नशेच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; सापळा रचत अल्पवयीनसह चौघांना अटक
काय आहे प्रकरण?
औंध भागात ७ जणांच्या टोळीने २८ जून रोजी 12.15 वाजता काही तरुणांवर कोयत्याने आणि काठ्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होत. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध भागात झालेल्या हल्ल्याचा उगम पूर्ववैमनस्यातून झाला होता. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पोलिसांनी सर्व सात आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि तीन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे प्रतीक सुनील कदम (26), अमीर अल्लाउद्दीन शेख (28), अतुल श्याम चव्हाण (27), रॉबिन दिनेश साळवे (26), समीर अल्लाउद्दीन शेख (26), जय सुनील गेंगाट (21), अभिषेक अरुण आवळे (24) असे आहे. या टोळीचे इतर गुन्हे आणि संभाव्य संपर्कही तपासले जात आहेत.
त्याचबरोबर गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होत असताना काही दिवसांपूर्वी बार्शीत मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बैल विकून आलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केला.
रावण सोपान खुरंगुळे (वय ७०, रा. वाणेवाडी) असे खून झालेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. अनंतराव उर्फ अनिल रावण खुरंगुळे असे खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिस पाटील राहुल लोखंडे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रावण सोपान खुरंगुळे यांनी बाजारात बैल विकले होते. त्याचे आलेले पैसे मुलगा अनंतराव याने मागितले. पण, पैसे न दिल्याने अनंतराव वडील रावण खुरंगुळे यांना रात्री काठीने व पोतराजाच्या वाकीने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत तालुका पोलिस ठाण्यात मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे करत आहेत. या अशा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काठीने बेदम मारहाण
काठीने व पोतराजाच्या वाकीने बेदम मारहाण करून खून केला. तालुक्यातील वानेवाडी येथे रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी उघडकीस ही घटना आली. घटनास्थळाची सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी पाहणी केली.
Akola Crime: अकोला हरदरलं ! गतिमंद अल्पवयीन मुलीचा चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार






