Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञातांनी पेटवली, जालन्यात रात्री काय घडलं?

नवनाथ वाघमारे हे लक्ष्मण हाके यांच्यासोबत राज्यभरात दौरा करत आहेत. जालन्यातील नीलमनगर भागात लक्ष्मण हाके गाडी पेटवण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला आहे. या घटनेने जालन्यात खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 22, 2025 | 10:05 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

जालना: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा संघर्ष पेटला आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्याला ओबीसी वर्गातून विरोध होताना पाहायला मिळतोय आणि राज्य सरकारच्या विरोधात ओबीसीची मोट बांधण्यासाठी राज्यभरात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे सभा घेत आहेत. सभा घेवून आव्हान देण्याचा प्रयत्न होत असताना काल त्यांची जालन्यातील नीलमनगर भागात गाडी पेटवण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला आहे. या घटनेने जालन्यात खळबळ उडाली आहे. नवनाथ वाघमारे हे लक्ष्मण हाके यांच्यासोबत राज्यभरात दौरा करत आहेत आणि हैदराबाद गॅझेटला विरोध करत आहेत.

Mumbai Crime: दोन गंभीर घटना! नालासोपाऱ्यात नायजेरियन युवकाची हत्या, मीरा भाईंदरमध्ये डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू

रात्री गाडी कशी पेटवली ?

जालन्यातील निलम नगर भागात गाडी उभी होती. रात्री ११ वाजताच्या दरम्यान एकाने ज्वलनशील पदार्थ गाडीवर टाकण्याचा प्रयत्न केला. गाडीवर चारही बाजूने ज्वलनशील पदार्थ टाकला आणि गाडी पेटवून दिली. सुदैवाने गाडी उभी असल्याने गाडीत कोणीही नव्हते.

पोलीस ठाण्यात तक्रार

नवनाथ वाघमारे यांनी या विरोधात जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. त्याने गाडी जाळण्याचा प्रयत्न का केला ? त्याचा उद्देश काय होता? याचा तपास पोलिसांकडून घेतला जाईल मात्र या घटनेने खळबळ माजली आहे.

कोण आहेत नवनाथ वाघमारे?

नवनाथ वाघमारे हे ओबीसी आंदोलक आहेत. बारामतीतही त्यांनी धनगर आरक्षणसाठी आंदोलन केल होत. अंतरवली सराटीत त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात उपोषण केल होत. सध्या राज्यात ओबीसी सभांमधून हैदराबाद गॅझेटला विरोध करत आहेत.

मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर केला हल्ल्याचा प्रयत्न

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा समाजाच्या लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. सदावर्ते जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलकाच्या भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. सदावर्ते हे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाविरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळेच आज मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले असताना काही मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर असणाऱ्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्ते यांना अनेकदा इशारेही देण्यात आले होते. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करणे सुरुच ठेवले आहे.
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Web Title: Obc protester navnath waghmares car was set on fire by unknown persons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: दोन गंभीर घटना! नालासोपाऱ्यात नायजेरियन युवकाची हत्या, मीरा भाईंदरमध्ये डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू
1

Mumbai Crime: दोन गंभीर घटना! नालासोपाऱ्यात नायजेरियन युवकाची हत्या, मीरा भाईंदरमध्ये डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू

Amravati Crime: प्रमोशन देतो, मुलीला माझ्याकडे पाठव, आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्यावर बलात्काराचा गुन्हा
2

Amravati Crime: प्रमोशन देतो, मुलीला माझ्याकडे पाठव, आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्यावर बलात्काराचा गुन्हा

Pune Crime : जिथे गोळ्या घातल्या आणि कोयत्याने हल्ला केला, तिथेच घायवळ गँगची पोलिसांनी धिंड काढली
3

Pune Crime : जिथे गोळ्या घातल्या आणि कोयत्याने हल्ला केला, तिथेच घायवळ गँगची पोलिसांनी धिंड काढली

Dharashiv News : धाराशिवमध्ये कला केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार; पाच केंद्रांवर पोलिसांची धाड
4

Dharashiv News : धाराशिवमध्ये कला केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार; पाच केंद्रांवर पोलिसांची धाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.