crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
कोलकाता: कोलकाता येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोलकाता येथील साऊथ साऊथ कोलकाता लॉ कॉलेज येथे सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. आधी एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ चित्रित करण्यात आले. त्यांनतर पीडितेला ब्लॅकमेल करून सामूहिक बलात्कार करण्यात आला.
Delhi Crime: शेजाऱ्याने दीड वर्षाच्या मुलीला घरी नेले आणि…; आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली
नेमकं काय घडलं?
कोलकात्यात 25 जून रोजी, लॉ कॉलेजच्या फर्स्ट सेमिस्टरच्या विद्यार्थिनीवर मुख्य आरोपी मनोजित मिश्रा आणि सह-आरोपी जैब अहमद, प्रमित मुखर्जी यांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील चौथा आरोपी सुरक्षा रक्षक पिनाकी बनर्जी असून त्याच्याविरुद्धही केस नोंदवली आहे.
पोलिसांनी याप्रकरणात ६५० पानाची चार्जशीट दाखल केली आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. चार्जशीटमध्ये नमूद केलं आहे की मुख्य आरोपी मानवजात मिश्रा याने पीडितेचे अनेक व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल केला. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले असून आरोपीचा डीएनए फॉरेन्सिक पुराव्यांशी जुळला आहे.
सीसीटीव्ही हाती
पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास केले असता त्यात आरोपी पीडितेला मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. शिवाय आरोपींच्या मोबाईलमधून पीडितेचे अनेक अश्लील व्हिडीओ मिळाले आहेत. ते व्हिडीओ लॉ कॉलेजच्या खोलीतील एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून चोरून चित्रीत करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासात आरोपींचे मोबाईल लोकेशन घटनास्थळी आढळली. तसेच जप्त केलेल्या व्हिडीओंमध्ये रेकॉर्ड झालेल्या आवाजांचा मेळ आरोपींशी बसतो, असे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.
सुरक्षा रक्षकावर देखील गुन्हा नोंद
या प्रकरणात लॉ कॉलेजच्या सुरक्षारक्षकावर चौथा आरोपी म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या चार्जशीटनुसार, सुरक्षा रक्षकाने या घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी खोली बाहेरून बंद केली. त्यामुळे त्याला सह-आरोपींच्या यादीत समाविष्ट केले गेले आहे.
कॉलेज प्रशासनाची कारवाई
या प्रकरणानंतर कॉलेज प्रशासनाने आरोपी मनोजित मिश्रा, जो 2024 पासून तात्पुरता कर्मचारी म्हणून काम करत होता, त्याला तात्काळ कामावरुन कमी केलं. त्याच्यासोबत सामील असलेल्या आरोपी विद्यार्थ्यांनाही कॉलेजमधून काढून टाकण्यात आले आहे.
मुंबईच्या नालासोपाऱ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन, अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकाला दिला चोप
मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. IITN अकॅडमीच्या शिक्षकाकडून एका १६ वर्षाच्या विध्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा समोर आलं आहे. याबाबतची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अकादमीमध्ये जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
शिक्षकाचे गैरवर्तन पीडित विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर आज पालकांनी अकॅडमीमध्ये जाऊन त्या शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.अटक केलेल्या शिक्षकाचे नाव राहुल दुबे असे आहे. तो नालासोपारा पश्चिम आयआयटीएन अकॅडमीमध्ये शिक्षक आहे.
सुरक्षारक्षकच निघाला चोर, पुणे पोलिसांकडून पर्दाफाश; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त