राजधानी दिल्ली येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात अलायचं समोर आलं आहे. शेजाऱ्याने मुलीला घरी नेले काही वेळाने तिच्या आईला तिचा रडण्याचा आवाज आला. आईने दरवाजा उघडताच आईला धक्काच बसला. मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली.
नेमकं काय घडलं?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, एका अलपवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराबाबत कापशेरा पोलिस स्टेशनला पीसीआर कॉल आला होता. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलीच्या आईने सांगितले की सकाळी नऊ वाजता तिचा शेजारी सुधीर उर्फ बिट्टू तिच्या दीड वर्षाच्या मुलीला त्याच्या खोलीत घेऊन गेला.काही वेळाने मुलीच्या रडण्याचा आवाज आतून ऐकू आला. दरवाजा आतून बंद होता आणि तो उघडताच मुलगी रक्ताने माखलेली आढळली. 32 वर्षीय आरोपी सुधीर उर्फ बिट्टू दारूच्या नशेत होता. त्याने दारूच्या नशेतच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर उर्फ बिट्टू हा उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवासी आहे. त्याला घटनास्थळीच पकडण्यात आले. पीडितेला तिच्या आईसह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांच्या निवेदनानुसार, घटनास्थळी गुन्हे पथकाला बोलावण्यात आले आणि आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले. आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या नालासोपाऱ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन
मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. IITN अकॅडमीच्या शिक्षकाकडून एका १६ वर्षाच्या विध्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा समोर आलं आहे. याबाबतची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अकादमीमध्ये जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
शिक्षकाचे गैरवर्तन पीडित विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर आज पालकांनी अकॅडमीमध्ये जाऊन त्या शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.अटक केलेल्या शिक्षकाचे नाव राहुल दुबे असे आहे. तो नालासोपारा पश्चिम आयआयटीएन अकॅडमीमध्ये शिक्षक आहे.