Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिष्णोई गोळीबारप्रकरणी राजस्थानमधून एका आरोपीला अटक; दहा दिवसांच्या प्रयत्नांना अखेर यश

तांत्रिक पाळत आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजस्थानमध्ये लपल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थान-पंजाब सीमेवर छापा टाकून त्याला अटक केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 04, 2026 | 12:12 PM
अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : बिष्णोई टोळीच्या धमक्यांचे पडसाद राज्यसभेत उमटले असून, पुण्यातील चार व्यावसायिकांना सलग खंडणीसाठी फोन आल्यानंतर पुणे पोलिसांनी दहा दिवसांच्या प्रयत्नानंतर एकाला अटक करण्यात यश आले आहे. पवन कुमार असे या आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला राजस्थान-पंजाब सीमेवरील परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याला ट्रान्झिट रिमांडवर पुण्यात आणले जात आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उरुळी देवाची येथील एका स्टील व्यावसायिकाला गेल्या महिन्यात (दि. २२) आधी धमकी देऊन नंतर काही तासात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. बिष्णोई टोळीच्या नावाने ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपींच्या पलायनाचा संपूर्ण मार्ग शोधत या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ऑटो, कॅब आणि बसने पलायन

पोलिस तपासात उघड झाले की, गोळीबारानंतर आरोपीने वापरलेली दुचाकी एका सोसायटीजवळ सोडून दिली. त्यानंतर त्याने सलग दोन ऑटो रिक्षांचा वापर केला आणि पुढे कॅबने नाशिक गाठले. नाशिकहून तो बसने सुरतला गेला आणि तेथून राजस्थानमध्ये पळून गेला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याच्या हालचालींचा संपूर्ण मागोवा घेतला.

राजस्थान-पंजाब सीमेवरून अटक

तांत्रिक पाळत आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजस्थानमध्ये लपल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थान-पंजाब सीमेवर छापा टाकून त्याला अटक केली.

पूर्वी कंपनीत मजूर म्हणून काम

चौकशीत आरोपी पूर्वी उरुळी देवाची परिसरातील एका कंपनीत मजूर म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक माहितीचा फायदा घेत त्याने स्टील व्यावसायिकाच्या गोदामाची रेकी करून टोळीला माहिती पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर खंडणी मागणी आणि गोळीबाराचा कट रचण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे.

आरोपीचा पलायन मार्ग

– सीसीटीव्हीतून ट्रॅक
– उरुळी देवाची- गोळीबारानंतर दुचाकीने उंड्री–ऑटो रिक्षाने नाशिक फाटा.

– नाशिक फाटा येथून कॅबने नाशिक येथे. तेथून खासगी बसने सुरत. नंतर राजस्थान. पोलिसांनी राजस्थान येथील पंजाब सीमेवरून पकडले.

‘मानसशास्त्रीय’ पद्धतीने केतनच्या खुनाचा उलगडा, पासपोर्ट अन् हुडीने दाखवली दिशा; पोलिसी खाक्याचा वापर नाही

Web Title: One accused arrested from rajasthan in the bishnoi firing case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Lawrence bishnoi Gang
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
1

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
3

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
4

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.