Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती झोपेत असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या पतीला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाळासाहेब मारूती जाधव (वय ५६, रा. बुर्केगाव, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2026 | 05:19 PM
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्यावर संशय घेत पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
  • मुलीची साक्ष आणि रक्ताचे डाग ठरले महत्त्वाचे
  • आरोपी पतीला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड
पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती झोपेत असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या पतीला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाळासाहेब मारूती जाधव (वय ५६, रा. बुर्केगाव, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेसह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना २३ जुलै २०२४ रोजी बुर्केगाव येथील आरोपीच्या राहत्या घरी घडली होती. याप्रकरणी आरोपीच्या मुलीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 

आरोपीला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी मारहाण करीत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून मुलगा आणि सून वेगळे राहत होते. त्यामुळे घटनेच्या वेळी आरोपी आणि त्याची पत्नी दोघेच घरात राहत होते. मृत महिला आणि तिची मुलगी एकाच कंपनीत काम करीत होत्या. घटनेच्या दिवशी आई कामावर आली नसल्याने तसेच तिचा फोनही लागत नसल्याने मुलगी आणि जावई तिच्या घरी गेले. घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी लाथ मारून दरवाजा उघडला असता महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या शेजारी खून करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड होती. त्याच खोलीत आरोपी पांघरूण घेऊन झोपलेला होता. मुलीने वडिलांना घटनेबाबत विचारले असता, आपणच पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याची कबुली दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा : मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई

मुलीची साक्ष ठरली निर्णायक

सहाय्यक सरकारी वकील एन. पी. कोंघे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. खटल्यात आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. आरोपीच्या मुलीने वडिलांविरोधात दिलेली साक्ष, आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग तसेच वैद्यकीय अहवाल हे पुरावे महत्त्वाचे ठरले. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी आरोपीला दोषी ठरवत जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हे सुद्धा वाचा : सातबारा, फेरफारसाठी नागरिकांचे हेलपाटे; इंदापूर तहसीलदारांच्या कारभाराविरोधात होणार सर्वपक्षीय आंदोलन

💡

Frequently Asked Questions

  • Que: पत्नीच्या हत्येप्रकरणी कोणाला शिक्षा झाली?

    Ans: बालासाहेब मारुती जाधव (वय ५६, रा. बुर्केगाव, हवेली) याला पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

  • Que: पत्नीची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: २३ जुलै २०२४ रोजी पत्नी झोपेत असताना चारित्र्यावर संशय घेत आरोपीने तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली.

  • Que: आरोपीला दोषी ठरविण्यात कोणते पुरावे महत्त्वाचे ठरले?

    Ans: मुलीने दिलेली निर्भय साक्ष, आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग आणि वैद्यकीय अहवाल हे महत्त्वाचे पुरावे ठरले.

Web Title: The court has handed down a severe sentence to a husband for the murder of his wife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!
1

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार
3

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार

1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी; लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार
4

1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी; लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.