
Seized Pune: बंद गोडाऊन आणि शेतातील शेडमध्ये लपलं होतं कोट्यवधींचं कांड? महिनाभराच्या पाळतीनंतर पहाटे सव्वादोनला छापा अन्...
कदमवाकवस्ती येथील शेतातील शेड आणि बंद पडलेल्या गोडाऊनमध्ये बेकायदा सुगंधित तंबाखूचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणावर महिनाभर बारीक पाळत ठेवली होती. खात्री झाल्यानंतर रविवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास एफडीए आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या अवैध कारखान्याचा मोठा पर्दाफाश झाला.
रविवारी पहाटे पथकाने या गोडाऊनवर छापेमारी केली असता, तिथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि मसाला आढळून आला. पोलिसांनी गोडाऊनची अधिक सखोल तपासणी केली असता तंबाखू पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन, पिशव्या, पॅकिंग बॉक्स तसेच एक चारचाकी वाहनही आढळून आले. या ठिकाणी अवैधरित्या तंबाखू तयार करून त्याचे पॅकिंग केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
या धडाकेबाज कारवाईत एकूण ११ लाख १५ हजार ७०० रुपयांची प्रतिबंधित तंबाखू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी रोहित गुप्ता (वय २६) याला ताब्यात घेतले आहे. प्रशासनाने हे बेकायदा उत्पादन केंद्र आणि गोदाम सील केले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
Ans: पुण्यातील लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती परिसरातील शेतातील शेड आणि बंद गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या अवैध सुगंधित तंबाखू कारखान्यावर छापा टाकण्यात आला.
Ans: एफडीए आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित तंबाखू, मसाला, पॅकिंग मशीन आणि चारचाकी वाहनासह ११ लाख १५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Ans: पोलिसांनी या प्रकरणी रोहित गुप्ता (वय २६) या संशयिताला ताब्यात घेतले असून, हे अवैध उत्पादन केंद्र व गोदाम सील करून गुन्हा दाखल केला आहे.