आकाश यांनी शक्ती याला पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे असणाऱ्या कोरगावकर पंपावर गुरुवारी दुपारी तीन वाजता बोलावून घेतले आणि भावजयशी अनैतिक संबंध ठेवून माझ्या भावाचे आयुष्य खराब केलेस, असे म्हणत बेदम मारहाण केली.
शिरोली : अनैतिक संबंधातून एकास सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंपात बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शक्ती विक्रम भोसले (वय ३३, रा. शाहूपुरी चौथी गल्ली, कोल्हापूर) यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आकाश अमोल कोरगांवकर (रा. न्यू पॅलेस, कोल्हापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शक्ती भोसले आणि आकाश यांच्या भावाची पत्नी यांच्यामध्ये गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या कारणावरून आकाश यांनी शक्ती याला पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे असणाऱ्या कोरगावकर पंपावर गुरुवारी दुपारी तीन वाजता बोलावून घेतले आणि भावजयशी अनैतिक संबंध ठेवून माझ्या भावाचे आयुष्य खराब केलेस, असे म्हणत बेदम मारहाण केली. लोखंडी रॉडने, स्टीलच्या बादलीने दोन्ही हातापायावर मारहाण करण्यात आली.
तसेच लाथाबुक्क्या घालून शक्ती आणि त्याच्या पत्नीस धमकी दिली. त्यानंतर शक्ती यांनी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार घेतले आणि शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नांदेडमध्ये पतीने केली पत्नीची हत्या
नांदेडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंध टिकवण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पत्नीने प्रियकराच्या मदतीने जिवंत असतानाच नदीत फेकला आहे. दरम्यान, या घटनेचा उलगडा दीड महिल्यानंतर झाला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये घडली आहे.
छत्तीसगडमध्येही एकाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून एक धक्कदायक घटना घडली आहे. बहिणीच्या लव्ह अफेअरचा राग आल्याने एका तरुणाने कुटुंबियांना मारहाण करत प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रियकर दुर्ग जिल्हा रुग्णालयात गार्ड म्हणून नोकरी करत होता. आरोपीने त्याच्या बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
Web Title: One person brutally beaten up for having an immoral relationship incident in shiroli kolhapur