छत्तीसगड: छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात प्रेमप्रकणातून एक धक्कदायक घटना घडली आहे. बहिणीच्या लव्ह अफेअरचा राग आल्याने एका तरुणाने कुटुंबियांना मारहाण करत प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रियकर दुर्ग जिल्हा रुग्णलयात गार्ड म्हणून नोकरी करत होता. आरोपीने त्याच्या बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या दुर्ग जिल्हा रुग्णालयात घडली आहे. येथे गार्डची नोकरी करणाऱ्या एका तरुणाचं आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाबाबत दोघांच्याही कुटुंबियांना माहित होतं. त्यामुळे काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबामध्ये तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांवर आरोप
घटनेच्या एक दिवस आधी तरुणीचा प्रियकर आणि त्याचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. परंतु पोलिसांनी तक्रारीची नोंद करून घेतली नाही. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून घेतली नाही. त्यानंतर हा वाद इतका वाढला की, शुक्रवारी रात्री आरोपीने कुटुंबियांसह प्रियकर तरुणांसह त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली. या हाणामारीत प्रियकर तरुण गंभीररीत्या जखमी झाला. रक्तबंबाळ झालेल्या या तरुणाला जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
जिल्हा रुग्णालयात रात्री राडा
मुलाची हत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक लोक रात्री २ वाजता जिल्हा रुग्णलयात आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर राडा करत होते. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा देताच लोक तिथून निघून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. आज शवविच्छेदन केल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवादाला मोठे खिंडार! तब्बल 208 नक्षलवाद्यांनी थेट…
गेल्या काही महिन्यांमध्ये भारत सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आत्मसमर्पण किंवा सुरक्षा दलांच्या गोळीचे शिकार हे दोनच पर्याय नक्षलवाद्यांच्या समोर ठेवले आहेत. तसेच देशातील नक्षलवाद मार्च 2026 पर्यन्त संपवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान छत्तीसगडमध्ये तब्बल 208 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
आज छत्तीसगडमध्ये तब्बल 208 नक्षलवाद्यांनी आत्म समर्पण केले आहे. मागील तीन दिवसांत एकूण 405 नक्षलवाद्यांनी समर्पण केले आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील माड क्षेत्र नक्षलवाद्यांचा गड समजला जातो. या भागातील 208 नक्षलवाद्यांनी बस्तर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात आत्मसमर्पण केले आहे. यावेळेस छत्तीसगडचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.