Ozokush ganja seized worth Rs 5.5 lakh seized in Baner by narcotics squad pune crime news
पुणे : पुण्यासारख्या शहरामध्ये दिवसेंदिवस ड्रग्ज माफियांचे होऊ लागले आहे. शहरामध्ये मागील वर्षाभरामध्ये अनेक प्रकरणे समोर आली आहे. मध्यवर्ती भागासह उच्चभ्रु परिसरामध्ये देखील गांजा सापडत आहे. नव्याने उच्चभ्रु परिसरात म्हणून नावारूपाला आलेल्या बाणेर परिसरात ‘ओझोकुश’ गांजा (हायड्रोफोनीक) पकडण्यात आला आहे. पोलिसांनी तब्बल साडे पाच लाखांचा हा गांजा पकडला आहे. 26 वर्षीय तरुणाकडे गांजा सापडल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
अर्जुन लिंगराज टोटिगर (वय २६, रा. सुसगांव, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शहरात अमली पदार्थ तस्कारांवर पोलिसांकडून जोरदार कारवाई केली जात आहे. ड्रग्ज मुक्त पुणे ही मोहिम देखील राबविली जात आहे. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना तस्कारांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.तरी देखील काही तस्कर छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक दोन हे बाणेर परिसरात हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना ओझोकुश गांजाबाबत माहिती मिळाली. या माहितीनुसार, पथकाने शिवशक्ती चौकात छापा टाकून अर्जुन टोटिगर याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५ लाख ५६ हजार रुपयांचा ओझोकुश गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याने हा गांजा कोठून आणला. तसेच, तो कोणाला विक्री करणार होता, याबाबत तपास सुरू केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सांगवीचा परिसर, बाणेर, बालेवाडी, औंध तसेच नव्याने वाढत असणाऱ्या परिसरात अमली पदार्थांची मोठी विक्री होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आलेले आहे. अमली तस्करांकडून हा परिसर टार्गेट करण्यात आल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यानंतर ही कारवाई झाली आहे. मात्र, या भागात उच्चभ्रू नागरिक, कॉलेजचे विद्यार्थि तसेच परदेशातून आलेले अनेकजन वास्तव्यास आहेत.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका प्रसिद्ध उद्योजकाला ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, उद्योजकाला धमकाविण्यासाठी पाकिस्तानातील मोबाइल क्रमांकावरुन संपर्क साधला आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या असून, गुन्हे शाखा तसेच सायबर पोलिसांकडून देखील तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय उद्योजकाने कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कोरेगाव पार्क येथील बोट क्लब रस्त्यावर राहायला आहेत. त्यांची खासगी विमान कंपनी (एव्हिएशन ) आहे. या कंपनीकडून हेलिकॉप्टर तसेच विमाने भाडेतत्त्वावर वापरण्यास दिली जातात. भारतासह दुबई, इंग्लडमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. २५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मोबाइलवर सोशल मिडीयाद्वारे संपर्क साधला गेला. संबंधित क्रमांक पाकिस्तानातील असल्याचे निदर्शनास आले असून, या क्रमांकावरुन उद्योजकाला ‘व्हॉइस नोट’ पाठविली होती. ‘तू नवीन हेलिकॉप्टर खरेदी करत आहेस ना. हेलिकॉप्टर खरेदी करण्यापूर्वी काही रकम द्यावी लागेल.’ असे त्या संदेशात म्हटले होते.