Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटकांचं सोनं अन् गाड्या होतायेत लंपास; अट्टल गुन्हेगारांना पाचगणी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पाचगणी व महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून ही ठिकाणं ओळखली जातात. मात्र या ठिकाणी चोरांनी पर्यटकांच्या पैशांवर व गाड्यांवर डाव टाकले आहे. पाचगणी पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 20, 2024 | 05:46 PM
pachgani Police Station

pachgani Police Station

Follow Us
Close
Follow Us:

वाई : वाई, पाचगणी आणि महाबळेश्वरला फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रातील पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येत असतात. पण या ठिकाणी असा एक गुन्हेगार होता जो आलेल्या पर्यटकांनाच लुटत होता. पर्यटकांचं सोनं हा गुन्हेगारल लंपास करत होता. तसेच गाड्या देखील पळवत होता. पाचगणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल पाच लाख 10 हजार रुपयांचा  मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की १० सप्टेंबर रोजी छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात लक्ष्मी स्टोअरसमोर लावलेली गॅबरेल फ्रांसीस जोसेफ यांच्या मालकीची अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची प्लेझर मोटर सायकल तसेच अविराम मेडिकल समोर एकनाथ काशिनाथ पवार रा. खिंगर यांची अंदाजे 40 हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा कंपनीची सिडी डॉन मोटर सायकल ही अज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत पाचगणी पोलीस ठाणेत तक्रार दाखल झाली होती. या दोन गाड्या चोरणारा चोरटा आरोपी प्रीतम सुनिल शिंदे (वय ३० रा. दामले आळी, गंगापुरी वाई ) यास वरील गुन्ह्यातील दोन्ही मोटर सायकल असा एकुण 90 हजार रूपयाचा माल हस्तगत केला आहे.  त्याच्यावर कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याच पद्धतीने 12 सप्टेंबर रोजी पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले पर्यटक इंदुबेन जगदीश ठक्कर (रा. कांदीवली मुंबई) यांचे रूममधुन सत्तर हजार रुपये किमतीच्या हिरेजडीत सोन्याच्या दोन अंगठ्या चोरीस गेल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत गुन्हयातील आरोपी माधव केशव लटपटे (वय २० रा. कोदरी ता. गंगाखेड जि. परभणी) यास अटक करून त्याच्याकडून गुन्हयात गेलेल्या दोन्ही हिरेजडीत अंगठया असा एकुण सत्तर हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत केला. त्याचेवर कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये पाचगणी परिसरातून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लागण्याकरीता विशेष प्रयत्न करून गहाळ झालेल्या मोबाईलपैकी ३५ मोबाईलचा शोध लावुन संबंधीतांना त्यांचे मोबाईल देण्यात आले आहेत. गुन्हयाच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उप विभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनावरून पाचगणी पोलीस ठाणेचे सपोनी दिलीप पवार पोलीस उप निरीक्षक बालाजी सोनूने, तपासी अंमलदार पो. हवालदार श्रीकांत कांबळे, पोलीस नाईक तानाजी शिंदे, पोलीस हवालदार विनोद पवार ,उमेश लोखंडे, अमोल जगताप यांनी या सर्व आरोपींना शोधण्यात यश मिळवले.

Web Title: Pachgani cops arrested thiefs who were stealing tourists gold and cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 05:46 PM

Topics:  

  • crime news
  • Pachgani
  • Satara News

संबंधित बातम्या

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
1

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय
2

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
4

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.