Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar: वनसंपत्ती वाचवण्यासाठी वनविभागाचा ‘धडा’! डहाणूत अवैध खैर तोडीवर धडक कारवाई; दीड लाखांचा साठा जप्त

पालघरच्या डहाणू वनपरिक्षेत्रात वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे दापचरी परिसरात धडक कारवाई केली. अवैध खैर लाकूड तोडीचा अंदाजे दीड लाखांचा साठा जप्त करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास सुरु आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 05, 2025 | 01:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • डहाणूत अवैध खैर तोडीचा साठा जप्त
  • गुप्त माहितीवर वनविभागाची धडक कारवाई
  • दीड लाखांचा माल जप्त, तपास सुरु

पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वनविभागाने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत वनसंपत्तीचे संरक्षण करण्याचा चोख ‘धडा’ दिला आहे. डहाणू वनपरिक्षेत्र उधवा आणि धानिवरी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दापचरी परिसरात धडक कारवाई करत अवैध खैर जातीच्या लाकडाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Pune Crime: संसार थाटला, अनेकांच्या घरी काम केलं… पण व्हिसाची मुदत संपली; दहशतवाद विरोधी पथकाने घेतलं ताब्यात

गुप्त माहितीच्या आधारे

सिलोंडा वनपाल योगेश कुलकर्णी आणि धानिवरी वनपाल विजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई–अहमदाबाद हायवेलगत दापचरी दुग्ध प्रकल्पाजवळील भागात मोठ्या प्रमाणात खैर जातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आली असल्याचे समोर आले. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या संपूर्ण पथकासह त्या ठिकाणी शोधमोहीम राबवली.

साठा जप्त

या शोधमोहीमेदरम्यान अंदाजे दीड लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा खैर जातीचा लाकूड साठा मिळाला. हा साठा जवळपास तीन पिकअप वाहनांच्या क्षमतेइतका मोठा होता. या लाकडाचा संपूर्ण माल डहाणू वनपरिक्षेत्र कासा येथील शासकीय काष्ठविक्री आगर, भराड येथे जमा करण्यात आला आहे.

या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सागर आरडेकर, वनपाल विजय पाटील व योगेश कुलकर्णी तसेच वनरक्षक संजू भुसारा, सुनील पवार, प्रवीण व दिनेश वाळू, किरण विल्हात, गुरुनाथ गांगोडे, राजेश बोबा, भिवा दळवी, लक्षी गोरखाना, लक्ष्मण थोरात, बंधु पराड, लक्ष्मण दळवी, कान्हा वेडगा आणि राजेश घरत यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या कारवाईनंतर वनविभागाकडून या अवैध खैर साठ्याचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा तपास सुरू करण्यात आला आहे. हा साठा नेमका कोठून आणला गेला आणि कोणा कडून साठवला गेला, याची चौकशी सध्या सुरु आहे.

वन विभागाच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना मोठा धडा मिळाला असून, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी विभागाच्या दक्षतेचे कौतुक केले आहे. वनसंपत्तीचे रक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वनविभागाची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. ही कारवाई भविष्यात अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर प्रतिबंध घालण्यास निश्चितच मदत करेल.

Haryana crime: पतीच्या बेरोजगारीचा सूड! पत्नीकडून वीट-दांडक्याने निर्घृण खून; मृतदेहाशेजारी बसून केला मेकअप

Web Title: Palghar crackdown on illegal logging in dahanu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • crime
  • palghar

संबंधित बातम्या

Bihar Crime: नवऱ्याच्या संशयातून सूड! ब्यूटी पार्लर महिलेवर अ‍ॅसिड हल्ल्यासाठी 1 लाखांची सुपारी
1

Bihar Crime: नवऱ्याच्या संशयातून सूड! ब्यूटी पार्लर महिलेवर अ‍ॅसिड हल्ल्यासाठी 1 लाखांची सुपारी

Bengluru Crime: बंगळूरू हादरलं! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने घरमालकिणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
2

Bengluru Crime: बंगळूरू हादरलं! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने घरमालकिणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल
3

हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल

Karnatak Crime: रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून
4

Karnatak Crime: रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.