Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar crime: ₹32 कोटींसाठी पार्टनरच्या हत्येची सुपारी; उद्योगपतीवर जीवघेणा हल्ला, 7 आरोपी अटकेत

पालघरच्या वसईतील जीएसएम फॉइल्स लिमिटेडचे भागीदार मोहनसिंह परमार यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे. कंपनीवर ताबा मिळवून ₹३२ कोटींचा फायदा मिळवण्यासाठी भाडोत्री शूटरकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. वालीव पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह सात आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 01, 2026 | 08:24 AM
अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर...

अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • कंपनीवर ताबा आणि ₹३२ कोटींच्या फायद्यासाठी भागीदाराच्या हत्येचा कट रचला.
  • भाडोत्री शूटरने उद्योगपती मोहनसिंह परमार यांच्यावर गोळीबार केला; ते बचावले.
  • वालीव पोलिसांनी मुख्य सूत्रधार सागर भानुशालीसह सात आरोपींना अटक केली.
पालघर: पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीवर संपूर्ण ताबा मिळवून तब्बल ₹३२ कोटींचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी स्वतःच्या पार्टनरच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमधील जीएसएम फॉइल्स लिमिटेडचे भागीदार मोहनसिंह लक्ष्मणसिंह परमार यांची सुपारी देण्यात आली. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना वालीव पोलिसांनी मोठा खुलासा करत मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशालीसह सात आरोपींना अटक केली असून, आर्थिक व्यवहार आणि कंपनीवरील वर्चस्वासाठी हा संपूर्ण कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मरण स्वस्त होतेय? वाहनचालकांचा बेशिस्तपणा; पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

काय नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसएम फॉइल्स लिमिटेडचे भागीदार सागर गिरीश भानुशाली आणि मोहनसिंह लक्ष्मणसिंह परमार यांच्यात व्यावसायिक भागीदारी होती. शेअर बाजारातील मोठ्या तोट्यामुळे सागर भानुशाली आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यानंतर त्याने परमार यांना कंपनीतील हिस्सेदारी विकण्यास प्रवृत्त केले. या व्यवहारातून सुमारे ₹३२ कोटींची रक्कम देण्यात आली होती. मात्र, ही रक्कम परत करावी लागू नये आणि कंपनीवर संपूर्ण नियंत्रण मिळवता यावे, या उद्देशाने भानुशालीने परमार यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

२४ जुलै रोजी परमार कंपनीबाहेर पडताच भाडोत्री शूटरने त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. दुसरी गोळी अडकून पडल्याने आरोपीने पिस्तुलाच्या बटाने त्यांच्या डोक्यावर वार केला आणि साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या परमार यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

घटनेनंतर वालीव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासादरम्यान उत्तर प्रदेशातून भाडोत्री शूटर, शस्त्रपुरवठादार आणि मुख्य सूत्रधारासह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Baramati News: बारामती पोलिसांचा धडाका! ११ लाखांच्या बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटचा साठा जप्त; मुंबई कनेक्शन उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: उद्योगपती मोहनसिंह परमार यांच्यावर हल्ला का करण्यात आला?

    Ans: कंपनीवर संपूर्ण ताबा मिळवून ₹३२ कोटींचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी.

  • Que: या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे?

    Ans: सागर गिरीश भानुशाली.

  • Que: पोलिसांनी किती आरोपींना अटक केली आहे?

    Ans: एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Palghar crime contract to kill business partner for 32 crore industrialist survives life threatening attack 7 accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.