Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Crime: माझ्या टोकाच्या पाऊलाला तेच जबाबदार…; वरिष्ठांच्या मानसिक त्रासाचा आरोप करत 57 वर्षीय अधिकाऱ्याची आत्महत्या

बोईसर येथील विराज प्रोफाईल कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप सुखदेव जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कंपनीचे CEO जे. पी. गर्ग यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुसाईड नोटमध्येही CEOवर आरोप करण्यात आ

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2026 | 10:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विराज प्रोफाईल कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप जाधव यांनी आत्महत्या केली.
  • CEO जे. पी. गर्ग यांच्याकडून मानसिक त्रास दिल्याचा आरोप.
  • पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून बोईसर पोलिसांकडून तपास सुरू.
पालघर: पालघर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. बोईसर येथील नामांकित कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. या घटनेने औद्योगिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे..

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रदीप सुखदेव जाधव (वय ५७) असे आहे. ते बोईसर येथील नामांकित विराज प्रोफाईल कंपनी’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. १९ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जाधव यांच्या घरातील आचाऱ्याने (कुक) त्यांच्या मुलाला फोन करून या घटनेची माहिती दिली. जाधव यांनी घरात गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान पोलिसांना मृताची एक डायरी आणि मोबाईल सापडला, ज्यामध्ये मृत प्रदीप जाधव यांनी लिहिलेली इंग्रजीतील सुसाईड नोट आढळून आली.

सुसाईड नोटमध्ये काय?

“सीईओ जे. पी. गर्ग हे माझ्या कामात सतत चुका काढून माझा छळ करत आहेत आणि माझ्यासोबत घाणेरडे राजकारण खेळत आहेत. माझ्या या टोकाच्या पाऊलाला तेच जबाबदार आहेत.” असे त्यांनी चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले आहे.

Gadchiroli Crime: झोपेत असलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने हत्या; एक हात असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

पत्नीने दिलेल्या तक्रारीत काय?

याप्रकरणी मृत प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार प्रदीप जाधव हे गेल्या काही वर्षांपासून विराज प्रोफाईल कंपनीत कार्यरत होते. मागच्या वर्षी त्यांनी प्रमोशनची मागणी केली असता, सीईओ जे. पी. गर्ग यांनी त्यांना जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. या त्रासाला कंटाळून जाधव यांनी कंपनीचा राजीनामा देऊन दुसऱ्या कंपनीत काम सुरू केले होते. मात्र, विराज प्रोफाईल कंपनीचे सीएमडी नीरज कोचूर यांनी मध्यस्थी करत त्यांना पुन्हा कंपनीत बोलावून घेतले आणि जानेवारी २०२६ मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर रुजू केले. दुर्दैवाने, ते पुन्हा रुजू झाल्यापासून सीईओ जे. पी. गर्ग यांनी त्यांना वारंवार मानसिक त्रास देणे आणि अपमानास्पद वागणूक देणे सुरूच ठेवले होते, ज्याची माहिती जाधव यांनी त्यांच्या पत्नीला वेळोवेळी दिली होती.

गुन्हा दाखल

याप्रकरणी मृत प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना प्रदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोईसर पोलिसांनी कंपनीचे सीईओ (CEO) जे. पी. गर्ग यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्याचे सब-इन्स्पेक्टर नितीन रामचंद्र नराले पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे..

Madhya Pradesh : लग्नाच्या एक दिवसाआधी तरुणीने संपवले आयुष्य, कारण अजूनही गुलदस्त्यात…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे?

    Ans: आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव प्रदीप सुखदेव जाधव (वय 57) असे आहे.

  • Que: या प्रकरणात कोणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: विराज प्रोफाईल कंपनीचे CEO जे. पी. गर्ग यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: पोलिसांना तपासात काय आढळले?

    Ans: पोलिसांना मृत प्रदीप जाधव यांची डायरी आणि सुसाईड नोट सापडली असून त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आले आहेत.

Web Title: Palghar crime my tokachya paulala is responsible 57 year old officer commits suicide alleging mental trauma from seniors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

Palghar News : डहाणूतील चिमुरडीवर अत्याचार अन् हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
1

Palghar News : डहाणूतील चिमुरडीवर अत्याचार अन् हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Vasai Tatli Andolan : ‘ताटली’ आंदोलनाला यश! शासनाने घेतली दखल; जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू
2

Vasai Tatli Andolan : ‘ताटली’ आंदोलनाला यश! शासनाने घेतली दखल; जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू

Palghar Flood Relief : पालघरमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून विशेष मदतीची घोषणा; बँक खात्यात जमा होणार पैसे
3

Palghar Flood Relief : पालघरमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून विशेष मदतीची घोषणा; बँक खात्यात जमा होणार पैसे

Vasai News : कचऱ्यात अडकलं शहराचं सौंदर्य, कोट्यवधींच्या शिल्पांची दुरवस्था; देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च
4

Vasai News : कचऱ्यात अडकलं शहराचं सौंदर्य, कोट्यवधींच्या शिल्पांची दुरवस्था; देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.