(फोटो सौजन्य: Pinterest)
सिंगरौली जिल्ह्यातील चित्रंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्थुआ बहेरा गावात सदर घटना घडल्याचे समोर आले आहे. भाजपा प्रजापति नावाच्या तरुणीचा तरुणीचा मृतदेह तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ज्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबाला धक्का बसला आणि पाहता पाहता घराजवळ लोकांचा जमाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी तरुणीचे लग्न सरई ठाणा परिसरातील एका तरुणासोबत आयोजित करण्यात आले होते. घरात लग्नाची लगबग सुरु होती. सर्व नातेवाईक जमले होते, सजावट झाली होती, लग्नाची लगबग सुरु होती आणि अशातच तरुणीच्या मृत्यूने सर्वांच्या आनंदावर विरझण टाकले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनेस्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणीच्या मृतदेहाला ताब्यात घेतलं. मृतदेहाचा पंचनामा करुन त्याला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं असून पोलिस पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत. तरुणीने लग्नाच्या एक दिवसाआधी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रत्येक बाजू विचारात घेऊन तपास करत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कुटुंबासह आजूबाजूच्या लोकांचीही चाैकशी सुरु करण्यात आलू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तपासाअंती आत्महत्येचे मूळ कारण स्पष्ट होईल. सध्या तपास सुरु असून आत्महत्येचे नक्की कारण काय याचा शोध घेतला जात आहे.






