पालघरमध्ये भीषण अपघात
ट्रकचा चालक गंभीर जखमी
ट्रक नदीत कोसळला
पालघर/Palghar Truck Accident: पालघरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात तवा येथे ट्रकला भीषण अपघात झाला आहे. भरधाव मालवाहू ट्रक नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला धडकला आणि तब्बल तीस फूट खोल नदीत कोसळला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात तवा येथे मालवाहू ट्रकला भीषण अपघात झाला आहे. भरधाव मालवाहू ट्रक नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला धडकला आणि तब्बल तीस फूट खोल नदीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकावर तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक नियंत्रण सुटल्याने झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
पिकअप आणि कारची समोरासमोर जोरदार धडक
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहाराबाद – अंतापूर मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
Nashik Accident: भीषण अपघात! पिकअप आणि कारची समोरासमोर जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू तर…
वाहतूक ठप्प
अपघातांनंतर ताहाराबाद – अंतापूर मार्गावर काही वेळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करून जखमींना वाहनांद्वारे शासकीय रुग्णालयात हलवले. जखमींपैकी दोन मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर वैधकीय उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आहे. पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करून या प्रकरणी संबंधित वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रेडीमिक्स डंपरच्या अपघाताने 11 वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत
वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 11 वर्षांच्या मुलाला नाहक त्रास सहन करावा लागला. रेडीमिक्स डंपरच्या झालेल्या अपघाताने या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या सगळ्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून मनसेने या सगळ्या हलर्जीपणावर रास्ता रोको केला आहे. काशिमिरा परिसरात आज दुपारच्या सुमारास एका रेडीमिक्सच्या डंपरने एका अकरा वर्षांच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात मुलाच्या कमरेखालच्या भागापासून गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.