नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहाराबाद – अंतापूर मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला
तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस, आणि आशा सोनवणे असे मृतकाचे नाव आहे.मृतक आणि जखमी मजूर हे सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत आणि असेरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पिकअप वाहन चालकाने आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
वाहतूक ठप्प
अपघातांनंतर ताहाराबाद – अंतापूर मार्गावर काही वेळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करून जखमींना वाहनांद्वारे शासकीय रुग्णालयात हलवले. जखमींपैकी दोन मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर वैधकीय उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आहे. पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करून या प्रकरणी संबंधित वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सावकारांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटी कामगाराची आत्महत्या
नाशिक शहरातील ध्रुवनगर परिसरात अवैध सावकारांच्या तगाद्याला कंटाळून एका कंत्राटी कंपनी कामगाराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र भगवान सूर्यवंशी (वय 39, रा. शारदा अपार्टमेंट, ध्रुवनगर) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हे सातपूर एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. 2021 ते 2022 या कालावधीत त्यांनी घरखर्च आणि इतर वैयक्तिक गरजांसाठी खासगी सावकारांकडून एकूण 7.70 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यामध्ये ६ टक्के व्याजदराने 4.70 लाख आणि 4 टक्के दराने 3 लाख रुपये घेतले गेले होते.
राजेंद्र यांनी या रकमेतील काही भागाची परतफेडही केली होती, ती ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात होती. मात्र, कर्जाची पूर्ण परतफेड न झाल्याने संशयित सावकारांनी सातत्याने त्रास देण्यास सुरुवात केली. पैशाची मागणी करताना त्यांनी राजेंद्र यांच्यावर मानसिक दबाव टाकत वसुलीसाठी तगादा लावला. याच त्रासाला कंटाळून राजेंद्र यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या खिशात सुसाईड न सापडली. त्या सुसाईड नोटमध्ये काही सावकारांची नावे नमूद करण्यात आली होती. ज्यांच्यामुळे त्यांनी हे टोकाचे पॉल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
टपका रे टपका…; आयुषच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं? लहान भाऊ अर्णवने दिली धक्कादायक माहिती