
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पोलिसांचा दणका; पाच सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार
राहुल प्रभाकर सावंत (रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), श्रेयश ईश्वर यादव (राहणार. गोपाळपूर), केबी उर्फ पप्पू कोळी (रा. गोपाळपूर), आप्पा उर्फ बंटी अनुसे, सतिश मोहन जगदाळे (रा. तावशी) वरील पाच तडीपार गुन्हेगारांना आज रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यामध्ये घेऊन सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील पुणे, सांगली, या जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या ठिकाणी नेऊन तडीपारची आदेशाची प्रत प्रत्येक आरोपीला बजावून तडीपारीची कारवाई केलेली आहे व त्यांच्याविरुद्ध विविध प्रकाराचे गुन्हे दाखल होते. या पाच जणाविरुद्ध पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अंतिम चौकशी करून संबंधित सर्वांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. जिल्ह्याच्या सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करणाऱ्या सामान्य जनतेस वेठीस धरणाऱ्या अवैध धंदे तसेच प्रशासनास वेठीस धरणाऱ्या गुंड प्रवृत्तीचे समुळ उच्चाटन केले जाणार आहे. अशा प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी कायदेशीर व सनदशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.