
crime (फोटो सौजन्य: social media)
या अपघातातील सय्यद कुटुंब ईदनिमित्त भेटीसाठी मंठ्याला त्यांच्या नातेवाईकाकडे जात होते. यावेळी याच मार्गावर मंठ्याकडून जिंतूरकडे येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हेलरची आणि कारची समोरा समोर जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की कार अक्षरशः रस्त्याच्या बाजूला गेली. अपघाताची ही घटना सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले.
Pune Crime: पुण्यात पिस्तूल दाखवताना गोळी सुटली; अल्पवयीन मुलगा जखमी, तिघे अटकेत
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सय्यद इस्माईल सय्यद मेहबूब, सय्यद सुमय्या अझर अली, अझर मेहमूद आणि 7 वर्षांची सय्यद उपाध सय्यद असे आहे. या कुटुंबाच्या निधनानंतर जिंतूर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आहे.
दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड
दिवाळीच्या सुमारास परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली होती. एका तरुणाचा खून करून वृद्ध दाम्पत्याला लुटल्याचा प्रकार समोर आला होता. आता खुनी दरोडेखोर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबुराव उर्फ बाबुशा सावळा पवार (वय ६०, रा. जालना) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आपल्या दोन साथीदारांसह वालूर झरी आणि पार्डी येथील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
नेमकं काय प्रकरण?
२२ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री वालूर येथील श्रीकृष्ण मंदिरात अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला होता. तेथे दत्तराव भोकरे आणि सुरूबाई भोकरे या वृद्ध दांपत्याला बेदम मारहाण करून त्यांच्या कानातील दागिने हिसकावले. त्यानंतर शेजारच्या शेत आखाड्यावर झोपलेला तरुण संतोष सोनवणे याच्यावर लोखंडी गजाने प्रहार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्याची आजी वच्छलाबाई यांनाही मारहाण करून दागिने लुटून दरोडेखोर फरार झाले होते.
पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी विशेष पथके नेमली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विवेकानंद पाटील यांनी झरी येथील ९ ऑक्टोबरच्या घटनेचा अभ्यास केला. झरी आणि वालूर या दोन्ही ठिकाणी दरोडेखोरांची अंगकाठी आणि गुन्हा करण्याची पद्धत सारखीच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हाच धागा पकडून पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा केले. वेगाने आपली तपासाची चक्रे फिरवत १५ जानेवारीला सापळा रचून बाबुराव पवारला ताब्यात घेतले. त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.
Beed Crime: संतापजनक! १० वर्षीय चिमुरडीवर ५० वर्षीय नराधमाचा आत्याचार, बीड येथील घटना
Ans: जिंतूर-चारठाणा महामार्गावर हा अपघात झाला.
Ans: या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला.
Ans: कार आणि टेम्पो ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला.