crime (फोटो सौजन्य: social media)
परभणी: परभणी मधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव जगन्नाथ हेंडगे आहे. ही घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हट्टा परिसरात असणाऱ्या हायटेक निवासी शाळेमध्ये घडली आहे. या घटनेला चार दिवस उलटले असून अद्याप आरोपी फरार आहे. आरोपीचे नाव संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण असे आहे. आरोपी फरार असल्यामुळे परभणी पोलिसांनी वाँटेड म्हणुन प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. पोस्टर जारी करत यांच्याबद्दल जो कुणी माहिती देईल त्याला बक्षीस ही देण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
लिफ्ट मागणे बेतले जिवावर, भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीचं मृत्यू
दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेले संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्या शोधासाठी एक विशेष पथक तर इत्तर ८ असे एकूण ९ पथक रवाना करण्यात आले आहे. आरोपी अद्याप सापडले नसल्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी नुकतीच गावात बैठक घेऊन याविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मागणी काय?
हा मोर्चा परभणी शहरातील कृष्णा गार्डन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. हा मोर्चा आज ( १५ जुलै) मंगळवारी काढण्यात येत आहे. या मोर्चात उखळद येथील सर्व गावकरी सहभागी होणार आहे. तसेच पूर्णा तालुक्यातील नागरिकही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये आरोपी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीला तात्काळ अटक करण्यात यावी. त्यांच्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.
दरम्यान, मॉन्सूनची सुरुवात झाली आहे. अनेक लोक पिकनिक आणि फिरण्यासाठी धबधब्यावर जातात. परंतु दक्षाता घेणे गरजेचे आहे. कारण मुंबईच्या वसईमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं जीवावर बेतलं आहे. डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल सोमवारी वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलं डोहात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धबधब्यापर्यंत दोन तासाची पायपीट करत जाऊन, एकाला पाण्यामध्ये बुडून तर दुसऱ्याला गाळाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतकाचे नाव प्रेम प्रल्हाद शहजराव (वय 22) रा. अशोक नगर काम इस्टेट रॉड गोरेगाव पूर्व, सुशील भारत ढबाले ( वय 24) रा. अशोक नगर काम इस्टेट वालभात रोड गोरेगाव पूर्व असे नाव आहे.