मुंबई येथून एक धक्कादायक आणि अमानवी घटना समोर आली आहे. कर्ज न फेडल्याने दोन तरुणांसोबत चार जणांनी अमानवी कृत्य केलं आहे. केवळ पैसे वेळेवर न दिल्याने या दोघांना मुखमैथुन करायला लावले असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एवढंच नाही तर त्यांनी पीडित तरुणांना निर्वस्त्र केले आणि त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. पीडित तरुणांपैकी एक अल्पवयीन असून १९ वर्षीय तरुण आहे. या घटनेननंतर पीडित मुलांपैकी एकाच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगून तक्रार दाखल केली. या संतापजनक घटनेने खळबळ व्यक्त होत आहे.
मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार, कारचा पाठलाग करत हल्ला
नेमकं काय घडलं?
पुढे आलेल्या माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी दिलीप गोस्वामी पीडित १९ वर्षीय मुलाला फसवून कारमधून पुण्याला नेले होते. या प्रवासादरम्यान कारमध्ये दिलिपचे मित्र धीरज, पंजूभाई गोस्वामी आणि भरत यांनी दोन्ही मुलांना मारहाण केली. मारहाणीत बेल्टचा वापर करण्यात आला. त्यानंतर ते पुण्यातून पुन्हा दक्षिण मुंबईतील भुलेश्वर भागात परतले. दरम्यान त्यांनी या दोन्ही पीडित तरुणांना घरात डांबून ठेण्यात आलं. तिथे देखील त्यांना मारहाण करण्यात आली. संतापजनक आणि धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी त्यांना ओरल सेक्स करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर या घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मुख्य आरोपी दिलीप गोस्वामी उर्फ ऋतिकला अटक केली आहे. त्याचे तीन साथीदार धीरज, पंजुभाई गोस्वामी आणि भरत हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पीडित मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु असून या तरुणांची मानसिक स्थिती अतिशय नाजूक असल्याची माहिती आहे. सध्या त्यांना समुपदेशन केले जात आहे.
दरम्यान, कोल्हापूर शहरातील भडगाव रोडवरील साई उद्यानाजवळील एका घरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर गडहिंग्लज पोलिसांनी मोठी कारवाई करत १२ जणांना अटक केली आहे. यामध्ये अड्डा चालवणारा मटका बुकी शंकर माळी याच्यासह चार महिला कामगारांचाही समावेश आहे. पोलिसांनी या छाप्यात सुमारे चार लाख चार हजार ११३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर करण्यात आली.
लिफ्ट मागणे बेतले जिवावर, भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीचं मृत्यू