
राज्य सरकारच्या मालकीची मुंढवा येथे ही चाळीस एकर जागा आहे. १९५५ पासून ती सरकारच्या मालकीची आहे. ही जागा १९७३ मध्ये राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर देण्यात आली आहे. त्यांच्या भाडेकराराची मुदत २०२८ मध्ये संपुष्टात येत आहे.
दरम्यान या जमिनीची बेकायदेशीररीत्या दस्तनोंदणी करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्राइझेस या कंपनी दिग्विजयसिंह पाटील, कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात हा व्यवहार झाला आहे. या प्रकरणी तेजवानी, पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
Parth Pawar यांच्या अडचणी वाढणार? नोंदणी विभागाकडून Amadia कंपनीवर…
खारगे समितीने यापूर्वीच या व्यवहारातील कुलमुखत्यारधारक तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांना समंन्स बजावून सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे, हा अब्जावधी रूपयांचा व्यवहार केवळ ५०० रूपयात करणाऱ्या अमेडिया कंपनीला या व्यवहारात २१ कोटी रूपयांचे मुद्रांक शुल्क बुडविल्या प्रकरणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २१ कोटी रूपये भरण्याची नोटीस बजावून पंधरा दिवसांची मुदत दिली होती.
मुदत संपण्याच्या एक दिवस आधी कंपनीने आणखी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी कंपनीने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे केली होती. त्यावर विभागाकडून आणखी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली.ही मुदत सोमवारी संपुष्टात आली. त्यामुळे कंपनी पैसे भरून व्यवहार रद्द करणार का, याकडे लक्ष लागून राहिले होते मात्र कंपनीने शुल्क न भरता आता वकीलांची नियुक्ती करून कायदेशीर लढाईचा मार्ग निवडला आहे.
Parth Pawar यांच्या अडचणी वाढणार?
पुण्यातील मुंढवा परिसरातील ४० एकर जमीन खरेदीप्रकरणात अमाडिया एंटरप्रायझेस एलएलपी या कंपनीवर राज्य नोंदणी विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. या कंपनीत दिग्विजय पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे भागीदार आहेत. विभागाने या कंपनीला २१ कोटींच्या स्टॅम्प ड्युटी तुटीबाबत नोटीस पाठवली असून, ती भरावी किंवा तुटीचे तपशीलवार स्पष्टीकरण द्यावे, अशी अंतिम मुदत सोमवारपर्यंत दिली आहे.