Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल; उपसभापती सहीशिवाय निविदा नाहीच

राज्य शासनाने ई-निविदांमध्ये विशिष्ट अटी न घालण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असताना बाजार समितीने मात्र उपसभापती सहीची अट घालून शासनाच्या आदेशांनाच हरताळ फासल्याचा आरोप संचालकांनी केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2026 | 11:10 AM
पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल!

पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल!

Follow Us
Follow Us:

पुणे : सलग तीन अधिवेशनात गैरकारभाराचे वाभाडे निघत असतानाही पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कारभाराला लगाम लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता नव्याने काढलेल्या ई-निविदांमध्ये उपसभापती यांच्या स्वाक्षरीचा स्थळ पाहणी अहवाल अनिवार्य केल्याने टेंडर प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही अट ठराविक व मर्जीतल्या ठेकेदारांना लाभदायी ठरणार असल्याची जोरदार चर्चा बाजार वर्तुळात रंगली आहे.

मुख्य बाजार आवारातील गेट क्रमांक १ जवळील पार्किंग, नवीन फुलबाजारासमोरील ट्रक पार्किंग, प्रवेशद्वार क्र. ३, भुसार विभागातील सर्व्हिस लेन, लोढा बिल्डिंगमागील पार्किंग, शिवनेरी रोडवरील पे अँड पार्किंग तसेच नो-पार्किंगमधील दुचाकी वाहने उचलण्यासाठी कामगारांसह टेम्पो भाडेतत्त्वावर घेणे अशा एकूण पाच ई-निविदा काढल्या आहेत. मात्र, या निविदांतील अटी जाचक व संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्य शासनाने ई-निविदांमध्ये विशिष्ट अटी न घालण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असताना बाजार समितीने मात्र उपसभापती सहीची अट घालून शासनाच्या आदेशांनाच हरताळ फासल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. त्यामुळे टेंडर आधीच ठरलेले तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकार्‍यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या पत्राद्वारे ई-निविदांमध्ये सर्वसाधारण अटी ठेवण्याचे निर्देश दिले होते. तरीही उपसभापती स्वाक्षरीचा स्थळ पाहणी अहवाल जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही अट काढून टाकावी, तसेच निविदांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संचालक प्रशांत काळभोर यांनी पत्राद्वारे केली आहे. याबाबत बाजार सिमतीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही

ठेका मिळाल्यानंतर भविष्यात क्षेत्रफळ कमी असल्याचे कारण देत पैसे कमी करण्याची मागणी ठेकेदाराने करू नये यासाठी स्थळ पाहणी अहवाल ठेवला आहे. स्थळ पाहणी अहवालावर सही घेण्यासाठी कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही.

– शशिकांत गायकवाड, उपसभापती आणि टेंडर समिती सदस्य, बाजार समिती, पुणे.

ई-निविदांना जास्तीत जास्त दिवसांची मुदतवाढ द्यावी

उपसभापती स्वाक्षरीची अट रद्द करण्याबाबत आमच्याकडे मागणी होत आहे. जास्तीत जास्त स्पर्धा करून बाजार समितीचे उत्पन्न वाढणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे कमीत कमी जाचक अटी ठेवाव्यात. तसेच प्रसिद्ध केलेल्या सर्व ई-निविदांना जास्तीत जास्त दिवसांची मुदतवाढ द्यावी.

– प्रशांत काळभोर, संचालक, बाजार समिती, पुणे.

हेदेखील वाचा : Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार

Web Title: New tender announcement in pune market committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय
1

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा
2

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
3

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
4

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.