Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारवाईत बेजबाबदारपणा करणाऱ्यांवरच दंडुका; महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली तंबी

मुळा - मुठा नदीच्या काठावर राडाराेडा टाकणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच आता कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात आयुक्त नवल किशाेर राम यांनीच कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2026 | 01:20 PM
कारवाईत बेजबाबदारपणा करणाऱ्यांवरच दंडुका; महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली तंबी

कारवाईत बेजबाबदारपणा करणाऱ्यांवरच दंडुका; महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली तंबी

Follow Us
Follow Us:

पुणे : मुळा – मुठा नदीच्या काठावर राडाराेडा टाकणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच आता कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात आयुक्त नवल किशाेर राम यांनीच कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे. पुणे शहरातील मुळा-मुठा नदीवर कोट्यवधी रुपये खर्च नदीकाठ सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बंडगार्डन येथील नदीकाठचे काम जवळपास पूर्ण झाले असून, नागरिकांसाठी खुले दिले केले आहे. परंतु याच प्रकल्पाच्या आडून नदीपात्रात भराव आणि राडारोडा टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

 

या प्रकारावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संताप व्यक्त केला असून, संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडनी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिसते तर तुमच्या डोळ्यांना हा गैरप्रकार का दिसत नाही, अशा शब्दात झापले असून, कर्तव्यात कसूर केल्यास कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

पुणे शहरातील नदीपात्रात अनधिकृतपणे बांधकामाचा राडारोडा टाकण्याच्या प्रकारांवर पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने गेल्या सोमवारी कोंढवे धावडे परिसरात धडक कारवाई करत संबंधितांवर २ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ह्या कारवाईला काही अवधी पूर्ण होत नाही तोवरच नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्पाच्या आडून मुंढवा परिसरात नदी पात्रात शेकडो ट्रक राडारोडा टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर संताप व्यक्त करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना झापले असून, जागा पाहणी करून तातडीने त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेने मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम ११ टप्प्यांत करण्यात येणार असून, त्यापैकी तीन टप्प्यांचे काम प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. प्रकल्पातील टप्पा क्र. ९ मध्ये संगमवाडी ते बंडगार्डन आणि टप्पा क्र. १० व ११ बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यानचे सुरू आहे. बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यानच्या कामासाठी नदीवरील मुंढवा पुलाच्या पूर्व बाजूने वाहने खाली उतरण्यासाठी ॲप्रोच (जोड) रस्ता करण्यात आला आहे. मुंढवा पुलाच्या पूर्वेस प्रकल्पाचे काम सुरू नसतानाही या प्रकल्पाच्या आडून मुंढवा स्मशान भूमीजवळ नदी पात्रात शेकडो ट्रक राडारोडा एक मोठा प्लॉट तयार करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी हजार ते बाराशे ट्रक राडारोडा टाकून पुलाच्या उंचीएवढा पट्टा तयार करण्यात आला आहे. नदी सुशोभीकरणाचे काम आणि या ठिकाणी टाकण्यात आलेला राडारोडा यामधील फरक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या सहज लक्षात येतो.

मुंढवा स्मशानभूमीजवळ पुन्हा राडारोडा

मुंढवा चौक ते स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रालगत पुन्हा मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात येत आहे. सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेने येथून शंभर ट्रक राडारोडा हटविला होता. मात्र त्यानंतरही पुन्हा तोच प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, नदीपात्रात राडारोडा टाकण्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे संबंधितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे मुंढवा चौकापुरते मर्यादित असल्याने नदीपात्रात ये-जा करणाऱ्यांची स्पष्ट नोंद होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत दोन पाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्यक्ष लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Pune municipal commissioner has warned employees who are irresponsible in their actions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Naval Kishore Ram
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय
1

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा
2

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
3

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
4

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.