एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार
लखनौ : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना उत्तर प्रदेशातील हजरतगंज भागात एका तरूणीला मदत करण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेण्यात आले. तेथे तिला नशेचे औषध टाकून कोल्ड्रिंक पाजले. नंतर या तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
हेदेखील वाचा : मैत्रिण दुसर्यासोबत फिरताना दिसली म्हणून तिचा जबडाच केला फ्रॅक्चर; पुण्यातील धक्कादायक प्रकार
हजरतगंज येथील रहिवासी असलेल्या तरूणीवर अत्याचार करण्यात आला. याबाबत तिने सांगितले की, ‘ती लखनौमध्ये मावशीकडे राहते. तिचा खटला कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी तिची कोर्टातच इंदिरानगर सहारा शॉपिंग सेंटरमधील निर्मिती कंपनीचा मालक मनीष द्विवेदी याच्याशी भेट झाली. या भेटीनंतर आरोपी मनीषने त्या तरुणीला मदतीचे आमिष दाखवले होते. त्यानुसार, या पीडितेने मनीषवर विश्वासही ठेवला. मनीषने नंतर पीडितेला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्या कोल्ड्रिंकमध्ये नशेचे औषध टाकून तिला बेशुद्ध केले.
आरोपी मनीषने हॉटेलमध्ये बेशुद्ध तरूणीवर अत्याचार केला. इतकेच नाहीतर या अत्याचाराचा अश्लील व्हिडिओही काढला. हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. आरोपीकडून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात येत होता. दरम्यान, पीडितेने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यावर तिचे केस ओढून मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
अखेर पोलिसांत तक्रार
सातत्याने होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडितेने हजरतगंज पोलिसांत तक्रार दिली. पीडितेने सोमवारी सकाळी आरोपी मनीष आणि त्याचा भाऊ आणि मेहुण्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची तक्रार दाखल होताच पोलिसांकडून तपास केला जात आहे.
पोलिस असलेल्या भावाकडून तुरुंगात पाठवण्याची धमकी
पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी मनीषचा मोठा भाऊ रवी राम द्विवेदी स्वत:ला पोलिस निरीक्षक आहे. आरोपी रवी रामला मनीषच्या कारनाम्याची माहिती मिळाली. आरोपी भावाने पीडितेला फूस लावण्यास सुरुवात केली. तो तिला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी देत असल्याचाही आरोप आहे.
नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणलं…
दुसरीकडे, पुण्यातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीचे आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई करून तब्बल अशा ५ तरुणींची सुटका केली आहे. ५ पैकी दोन तरुणींना त्यांच्याच पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
हेदेखील वाचा : पतीने नोकरीचे आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणलं अन् थेट कुंटणखान्यात…; पुणे पोलिसांची मोठी कारवाई