सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : मैत्रिण दुसर्यासोबत फिरताना दिसल्यानंतर चिडलेल्या मित्राने तिला दुसऱ्यासोबतच तुझा जाण्याचा संबंध काय ? अशी विचारणा करत तिला जबर मारहाण करून जबडा फ्रॅक्चर केल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर येथील मॉडल कॉलनी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी रोहन जग्गन्नाथ कदम (वय २७, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदीराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडी येथे राहणार्या २३ वर्षीय तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तरूणी आणि रोहन कदम हे मित्र- मैत्रीण आहेत. परंतु, दिवाळीपासून ते काही कारणावरून एकमेकांशी बोलत नव्हते. दोन दिवसांपुर्वी (दि. ९ नोव्हेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तरूणी त्याच्या दुसऱ्या एका मित्रासोबत दुचाकीवर जात असताना रोहन याने पाहिले. याचवेळी रोहनने तिला थांबवुन तु कोठे चालली आहेस, अशी विचारणा केली. दुसर्या सोबत फिरण्यास जाण्याचा तुझा काय सबंध आहे ? असे म्हणत वाद घातला. तसेच, त्याने हाताने बुक्यांनी चेहर्यावर गंभीर मारहाण केली. या मारहाणीत तरूणीचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर तरुणीने पोलिसांकडे त्याची तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : …अन् डावच फसला! सिक्युरिटी अलार्म वाजताच एटीएममध्ये छेडछाड करणाऱ्या चोरट्याला पकडले
जगभरात महिलांवरील अत्याचाराविरुद्ध अनेक कायदे असले तरी सार्वजनिक ठिकाणी आणि घरातही महिलांवरील अत्याचारांमध्ये घट झालेली नाही. पुण्यातही गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली बाणेर येथील टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या मित्र आणि त्याच्या मैत्रिणीला बेदम मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
रविवारी सायंकाळच्या सुमारास अबिनियू चवांग आणि त्यांची मैत्रीण चिंगमलाई पामेई हे बाणेर येथील टेकडीवर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी १८ ते २० वयोगटातील चार जणांच्या टोळक्यांणे त्या दोघांना अडवले. त्यांना शस्त्राचा धाक दाखवत मारहाण बेदम केली. ते बदमाश एवढ्यावरच नाही थांबले, तर त्यांनी चिंगमलाईच्या करंगळीवर शस्त्राने वार केला. त्यात तिच्या कारंगळीला मोठी जखम झाली. मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल, इअर बड, तसंच अन्य साहित्य चोरी करून ते चौघे पसार झाले.