
Police Surveillance 20 उमेदवारांकर पोलिसांची करडी नजर,
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सक्रीय झाले आहेत. पुण्यातील सक्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या २० उमेदवारांची यादी तयार केली आहे. ही यादी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. राज्य सरकार आणि पोलिसांची या उमेदवारांकडे विशेष नजर ठेवली जाणार आहे. त्यामाध्यमातून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शपणे पार पाडण्यासाठी पुणे पोलिस अलर्ट झाले आहेत. (PMC Eletion 2026)
पुणे पोलिसांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही महत्त्वाची पडताळणी करण्यात आली होती. या पडताळणीवेळी पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आली. पुण्यात अडीच हजार इच्छुकांपैकी 1545 जणांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राजकीय गुन्ह्यांची नोंद असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहेत. पण त्यापेक्षाही काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले अनेकजणांना उमेदवारी देण्यात आल्याचे दिसून आले आहे.
त्याहून गंभीर बाब म्हणजे, काही कुख्यात गुन्हेगारांचे नातेवाईकांना थेट प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात प्रचारसभां चांगल्याच रंगणार असल्याचे दिसत आहे. पण त्याचवेळी या गुन्हेगार आणि त्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी कशी कमी होणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांनी केलेल्या गुप्त माहिती आणि पडताळणीत पुण्यात सध्या २० सराईत गुन्हेगार निवडणुकीच्या रिंगणात सक्रीय आहेत. या सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी २० जणांवर करडी नजर ठेवली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांकूडन मतदारांवर दबाव टाकणे, दहशत निर्माण करणे, पैशांचा गैरवापर, समाज माध्यमांवरून अफवा पसरवणे किंवा विरोधकांना धमकावणे, असे कोणतेही प्रकार होऊ नयेत, यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
संशयित उमेदवारांच्या हालचालींची दररोज नोंद ठेवली जात असून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, बैठका, सोशल मीडिया पोस्ट्स आणि प्रचार पद्धतींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. गरज भासल्यास कारवाई, प्रतिबंधात्मक तडीपारी, नोटिसा तसेच आचारसंहितेनुसार कठोर पावले उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे.या यादीत सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, जयश्री मारणे, कल्याणी कोमकर आणि बापू नायर यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.