Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाकी वर्दीतील लाचखोर! ‘घरी बोलावून लाच स्वीकारली अन्….’, महिला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार लता दराडे यांना ₹२० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 28, 2025 | 03:36 PM
महिला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात (Photo Credit - AI)

महिला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • लाचखोरीचा पर्दाफाश!
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस हवालदार एसीबीच्या सापळ्यात
  • तक्रारदाराच्या घरात घुसून केली कारवाई
छत्रपती संभाजीनगर (श.प्र.): तक्रारदार महिलेसह तिच्या मित्राविरुद्ध पतीने दौलताबाद पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रार अर्जावर कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी ₹२० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या एका महिला पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई २७ नोव्हेंबर रोजी गारखेडा परिसरात करण्यात आली. लता बाळासाहेब दराडे (वय ३७, रा. एमरॉड सिटी, गारखेडा परिसर) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून, तिच्याविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार दाबण्यासाठी मागितली लाच

तक्रारदार महिलेच्या पतीने तिच्यासह तिच्या मित्राविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करण्यासाठी आणि त्यात मदत करण्यासाठी हवालदार लता दराडे हिने तक्रारदार महिलेकडे प्रत्येकी दहा हजार असे एकूण ₹२० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २६ नोव्हेंबर रोजी एसीबीकडे लेखी तक्रार नोंदवली.

हे देखील वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! शहराचे पाणीपुरवठा वेळापत्रक पुन्हा बिघडले; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

घरी बोलावून लाच स्वीकारली

एसीबीच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सापळा रचण्यात आला. मात्र, हवालदार दराडे पोलीस ठाण्यात उपलब्ध न झाल्याने तक्रारदाराने त्यांना फोन केला. तेव्हा दराडे हिने तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन थेट स्वतःच्या घरी (गारखेडा परिसरात) बोलावले. तक्रारदार महिला आणि तिच्या मित्राकडून ₹२० हजारांची लाच स्वीकारताच, आजूबाजूला दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पोलीस हवालदार लता दराडे हिला रंगेहाथ पकडले.

रक्कम आणि मोबाईल जप्त

आरोपी लता दराडे हिच्या अंगझडतीदरम्यान ₹२० हजार रुपयांची लाचेची रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीचा मोबाईल सील करून त्याचे विश्लेषण व डिजिटल तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, तिच्या घरातील झडतीची पूरक कारवाईही सुरू आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी कागणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपाधीक्षक सुरेश बाळासाहेब शिंदे, उपाधीक्षक संगीता पाटील यांच्यासह एसीबीच्या पथकाने केली.

हे देखील वाचा: पुरूषहो! कुटुंबनियोजनात आता तुमचाही वाटा, 4 डिसेंबरपर्यंत ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’, गैरसमजाचे सावट होणार दूर

Web Title: Police constable caught by acb while taking bribe in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime
  • police

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! शहराचे पाणीपुरवठा वेळापत्रक पुन्हा बिघडले; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
1

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! शहराचे पाणीपुरवठा वेळापत्रक पुन्हा बिघडले; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

Kapil Sharma Canada Cafe: गुन्हे शाखेची मोठी कारवाई! कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक
2

Kapil Sharma Canada Cafe: गुन्हे शाखेची मोठी कारवाई! कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

Maha E Seva Kendra News: शेंदूरवादा येथील महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे ठप्प; शेतकरी, नागरिकांची मोठी गैरसोय
3

Maha E Seva Kendra News: शेंदूरवादा येथील महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे ठप्प; शेतकरी, नागरिकांची मोठी गैरसोय

Pune Crime: फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक! ताम्हिणी घाटात घडला थरार
4

Pune Crime: फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक! ताम्हिणी घाटात घडला थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.