छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! (Photo Credit- X)
२७४० कोटींच्या योजनेला खीळ
३५ एमएलडी पाणी वाढूनही स्थिती बिकट
फारोळा येथे नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण ऑगस्टमध्ये झाले होते. त्यानंतर सप्टेंबरपासून ९०० मि.मी. लाईनमधून वाढीव ३५ एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) पाणी शहरासाठी सोडण्यात आले होते. याचा थेट फायदा म्हणून शहराचा पुरवठा आठव्या दिवसावरून पाचव्या दिवशी आला होता. मात्र, सध्या सुरू असलेले शटडाऊन चक्र लांबत चालल्याने पाणीपुरवठ्याचा कालावधी पुन्हा आठ-नऊ दिवसांवर गेला आहे, ज्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
जलकुंभांनुसार सध्याची पाणीपुरवठ्याची स्थिती:
| जलकुंभ (Water Tank) | सध्या पाणी मिळण्याचा कालावधी |
| क्रांतीचौक | ७ वा दिवस |
| कोटला कॉलनी | ७ वा दिवस |
| विद्यापीठ | ८ वा दिवस |
| जुबली पार्क | ८ वा दिवस |
| एन-५ (आर-२) | ८ वा दिवस |
| शिवाजीनगर | ७ वा दिवस |
| एन-५ (आर-१) | ६ वा दिवस |
| जय विश्वभारती | ११ वा दिवस |






