इचलकरंजी तालुक्यात जुगार अड्डयावर छापा, नऊ जणांना अटक; तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी : कबनूर येथील रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत बेकायदेशीरपणे विनपरवाना सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेऊन राेख रक्कम, माेबाईल व माेटरसायकली व इतर साहित्य असा २ लाख १९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाेलिस काॅन्स्टेबल सुनिल दत्तात्रय बाईत यांनी फिर्याद दिली आहे.
कबनूर येथील परीट गल्लीत राहणाऱ्या रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी तेथे रवी सुरेश परीट (वय ३२, रा. परीट गल्ली), गजानन तानाजी गाेसावी (वय ३८, रा. बागडे गल्ली), सुनिल निवृत्ती पाेमण (वय ३५, रा. बागडे गल्ली), बाबासाे अशाेक आवळे (वय ३५ रा. साठेनगर), भरत शंकर रावळ (वय ५५, रा. पाणी टाकीजवळ), दत्तात्रय शिवराम पाटील (वय ३६, रा. अष्टविनायक काॅर्नर), अवधुत पुंडलिक सुतार (वय ४०, रा. बागडी गल्ली), मनाेज नानासाे देसाई (वय ५०, रा. गंगानगर) व रमेश आप्पासाे सुतार (वय ५४, रा. शिवाजी काॅर्नर कबनूर) जुगार खेळताना आढळून आले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत १० हजार ५४० रुपयांची राेकड, ६८ हजार ८०० रुपयांचे ६ माेबाईल व १ लाख ४० हजाराच्या दाेन दुचाकी असा २ लाख १९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : 30 हजाराची लाच मागणं भोवलं! महिला पोलीस हवालदारासह दोघांना रंगेहात पकडले
शाहू कॉर्नर परिसरातही मोठी कारवाई
गेल्या काही दिवसाखाली इचलकरंजी येथील शाहू कॉर्नर परिसरात एका हॉटेलच्या मागे असलेल्या सुवर्णयुग कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ११ हजारांची रोकड, १ लाख ६० हजारच्या तीन दुचाकी, १५ हजारांचे ६ मोबाईल व २० हजारांचे जुगाराचे साहित्य असा २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार अमित दिपक कदम यांनी फिर्याद दिली आहे. यावेळी पांडुरंग बाबुराव कांबळे (वय ५३ रा. सुतार मळा), रफिक मलिक मिरजे (वय ४२ रा. कारंडे मळा), स्वप्निल तानाजी काळे (वय ३३ रा. नारायणनगर), संजय विनायक कुलकर्णी (वय ५३ रा. सम्राट अशोकनगर), खंडू ज्ञानदेव वरूटे (वय ३२ रा. शाहू कॉलनी), आयुब हबीब अन्सारी (वय ४९ रा. हत्ती चौक), विश्वनाथ विलास लवटे (वय ४१ रा. लिगाडे मळा), रोहिदास रमेश शिंदे (वय ३१), विशाल किरण कांबळे (वय २४ दोघे रा. टाकवडे वेस), प्रकाश सदाशिव भिसे (वय ४३ रा. कोल्हापूर), संतोष विलास बाबर (वय ४९ रा. हत्ती चौक), मोहिन मेहबुब बैरागदार (वय २८ रा. गावभाग) व शाहनुर इसाक सावळगी (वय ४८ रा. हत्ती चौक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत १० हजार ९०० रुपयांची रोकड, १ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या ३ दुचाकी, १५ हजार रुपये किंमतीचे ६ मोबाईल व २० हजाराचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.